कोणताही खेळाडू अनेक वर्ष मेहनत करून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचतो. परंतु जेव्हा त्याला त्याच्या आवडत्या खेळापासून दूर होण्यास भाग पाडलं जातं, तेव्हा अनेकांचा धीर सुटतो. अशीच परिस्थिती बॅडमिंटनपटू कुहू गर्ग हिच्यावरी आली होती. मात्र तरीही तिनं हिम्मत हारली नाही.
कुहू गर्गला यूपीएससी (UPSC) परीक्षेत 178 वा रँक मिळाला आहे. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र यशाचा मार्ग तिच्यासाठी सोपा नव्हता. कुहूचे वडील अशोक कुमार यांनी सांगितलं की, कोविड-19 साथीच्या आजारानंतर कुहूला उबेर कपच्या चाचण्यांदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर तिला शस्त्रक्रिया करावी लागली. तिला एक वर्ष बॅडमिंटन कोर्टवर उतरता न आल्यानं तिनं नागरी सेवांसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला.
कुहूच्या वडिलांनी भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) काम केलं आहे. त्यांनी गेल्या वर्षीच निवृत्ती घेतली. कुहूचे वडील अशोक कुमार हे नोव्हेंबर 2020 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत उत्तराखंडचे डीजीपी राहिले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टद्वारे आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की,”आमच्या कुटुंबासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे.”
आज पूरे परिवार के लिए गर्व का पल है कि बेटी कुहू गर्ग आज घोषित हुए upsc के परिणामो मे 178वी रैंक लेकर आईपीएस IPS मे सेलेक्ट हुई |
कुहू बैडमिंटन की अंतर्राष्ट्रीय खिलाडी रही है और उसने 9 वर्ष की उम्र से ही खेलना चालू कर दिया था | कुहू ने 56 नेशनल / आल इंडिया रैंकिंग और 19… pic.twitter.com/LyBs4sJPtL— Ashok Kumar IPS (@AshokKumar_IPS) April 16, 2024
कुहू गर्ग हिनं वयाच्या 9 व्या वर्षी बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली होती. तिनं महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत 56 राष्ट्रीय आणि 19 आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. कुहूनं 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तिच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांची मुलगी कदाचित पहिली खेळाडू असेल, जिनं 6 वर्ष आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळलं, वर्ल्ड चॅम्पियनशिपची क्वार्टर फायनलही खेळली आणि आता ती IAS किंवा IPS होणार आहे.
आपल्या यशाचं श्रेय तिचे वडील अशोक कुमार यांना देताना कुहू गर्ग म्हणाली की, “बाबा डीजीपी असताना दररोज अनेकांना मदत करायचे. हे सर्व पाहून मलाही प्रेरणा मिळायची. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. मी ती वाचली आहेत. माझ्या यशात माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
ट्रेंट बोल्टच्या एका यॉर्करनं लाखोंचं नुकसान! कोलकाताविरुद्धच्या सामन्यात असं काय घडलं?
मालक असावा तर असा! पराभवानंतर स्टेडियममध्ये भावूक झाला ‘किंग खान’, सामन्यादरम्यान दिसला वेगळाच अवतार