इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही स्पर्धा सध्या जगातील सर्वाधिक प्रसिद्धीची देशांतर्गत क्रिकेट लीग आहे. 2008 साली आयपीएल सुरु झाली. आजपर्यंत आयपीएलमध्ये हजारो खेळाडू खेळले आहेत. काही असेही खेळाडू आहेत, जे जागतिक क्रिकेटमधून निवृत्त झाले, परंतू आयपीएल खेळत राहिले. यंदा आयपीएलचा 17 वा हंगाम आहे. परंतू तुम्हाला माहिती आहे का, आयपीएल 2024 मध्ये असे 7 खेळाडू आहेत, जे आयपीएलच्या सतराही हंगामात खेळले आहेत. कोण आहेत हे शिलेदार ते पाहूयात…
1. एमएस धोनी – धोनी हा भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी जसा एक आहे, तसाचा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. 42 वर्षीय धोनी उर्फ थाला आजही आयपीएलमध्ये धुमाकूल घालतो आहे. त्याने आजवर सीएसके सह पुणे संघाकडून आयपीएल खेळली आहे. तर त्याच्या नेतृत्वात चेन्नईने 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. धोनीची कदाचित ही शेवटची आयपीएल असू शकते.
2. रोहित शर्मा – रोहित शर्मा याने डेक्कन चार्जेर्स संघातून आयपीएलच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर 2011 मध्ये रोहित मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. त्याने मुंबईचा कर्णधार म्हणून 5 विजेतेपद जिंकले आहेत. तर एकूण 6 ट्रॉफी जिंकणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.
3. विराट कोहली – आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे, जो 17 वर्षे एकाच संघाचा भाग राहिला आहे. 2008 मध्ये विराट कोहलीने आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तसेच आयपीएलमध्ये 7000 पेक्षा अधिक धावा करणारा विराट एकमेव खेळाडू आहे. पण दुर्दैवी बाब म्हणजे त्याच्या संघाने आजवर एकदाही ट्रॉफी जिंकली नाही.
4. दिनेश कार्तिक – दिनेश कार्तिक हा आयपीएलमधला एक स्टार विकेटकीपर वजा फलंदाज राहिला आहे. दिनेश कार्तिक सध्या आरसीबीकडून खेळत आहे. मात्र त्याने दिल्ली संघामधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तसेच तो मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, केकेआर, गुजरात लायन्स संघाचाही भाग राहिला आहे. दिनेश कार्तिक सध्या त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळत आहे. परंतू त्याचा फॉर्म पाहाता तो आणखीन एक सिझनही खेळू शकतो.
5. शिखर धवन – पंजाब किंग्स संघाचा सध्याचा कर्णधार असलेला शिखर धवन याने आयपीएलमध्ये पूर्वीच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्याची दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याने मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद संघांमधून आयपीएल खेळली आहे. तो देखील आयपीएलचे सर्व सीझन खेळला आहे.
6. मनीष पांडे – आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू असलेल्या मनीष पांडे याने 2008 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो देखील आयपीएलमध्ये सलग 17 हंगाम खेळत आहे. मनिष पांडेने 170 सामन्यात 3808 धावा केल्या आहेत. सध्या तो केकेआर संघात आहे.
7. रिध्दीमान साहा – गुजरात टायटन्सचा विकेटकीपर फलंदाज असलेला रिध्दीमान साहा हा देखील 2008 पासून आयपीएल खेळत आहे. केकेआर संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रिद्धीमान साहाने आजवर चेन्नई आणि गुजरातचे प्रतिनिधीत्व केले आहे.