हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला होता. तत्पूर्वी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे.
यानंतर आता मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबरपासून ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. हा सामना भारतीय संघाला जिंकायचा असेल तर भारतीय संघातील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. चला तर पाहूया ओव्हलच्या मैदानावर कशी राहिली आहे भारतीय संघाची कामगिरी?
इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. परंतु इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. ओव्हलची खेळपट्टी ही फलंदाजी करण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे ही मालिका जिंकायची असेल तर, भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागली आहे.
ओव्हलच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या सक्रिय भारतीय फलंदाजांच्या टॉप-५ मध्ये केएल राहुल सर्वोच्चस्थानी आहे. त्याने २०१८ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध १४९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर या यादीत रिषभ पंतचे नाव आहे. रिषभने या मैदानावर ११४ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने देखील या मैदानावर अर्धशतकी खेळी केली आहे. दुसरीकडे या मैदानावर भारतीय कर्णधार विराट कोहलीला एकही शतक झळकवता आले नाहीये. (Indian Batman’s record at oval ground)
ओव्हलच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ भारतीय फलंदाज
केएल राहुल – १८६ धावा
रिषभ पंत – ११९ धावा
रवींद्र जडेजा – ९९ धावा
विराट कोहली – ७५ धावा
हनुमा विहारी- ५६ धावा
या फलंदाजांसह चेतेश्वर पुजाराने ओव्हलच्या मैदानावर ५२ धावा केल्या आहेत. तर अजिंक्य रहाणेने ४१ आणि आर अश्विनने २० धावा केल्या आहेत. ओव्हलच्या मैदानावर मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अशात हा सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्यासाठी राहुल आणि पंतला आपल्या शतकी खेळीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भांडं फुटलं! धोनीचा हुकुमी एक्का ‘या’ कलाकाराच्या बहिणीला करतोय डेट, सर्वत्र रंगली एकच चर्चा
अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायची आहे कसोटी मालिका, तालिबानी यावेळीही घालणार खोडा?