---Advertisement---

आशिया चषकासाठी संघ निवडताच कार्तिकचा पारा चढला, कर्णधार रोहितला विचारले रोक-ठोक प्रश्न

Rohit Sharma And Dinesh Kartik
---Advertisement---

सोमवारी (21 ऑगस्ट) आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाच्या खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या निवड समितीने 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल, तर अष्टपैलू हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. या संघात विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले. त्याचबरोबर आशियाई चषक संघात तिलक वर्मा, ईशान किशन आणि शुभमन गिलसारखे खेळाडू असतील. मात्र, संघ निवडीनंतर भारतीय खेळाडू दिनेश कार्तिकने आपली प्रतिक्रिया दिली.

दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) म्हणाला की, “विशेषता 2 क्षेत्रांवर काम करणे सोपे जाणार नाही. आशिया चषकादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) ला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आशिया चषकमध्ये भारतीय संघाचा चौथा मध्यमगती गोलंदाज कोण असेल? संगाकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज असे तीन वेगवान गोलंदाज आहेत, पण चौथा गोलंदाज कोण असेल? भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने सांगितले की शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा किंवा मुकेश कुमार चौथ्या वेगवान हे असतील का? गोलंदाजाची निवड रोहितसाठी सोपी होणार नाही.”

कार्तिकने भारतीय फलंदाजीवर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आमच्या संघाला खरोखरच डाव्या हाताची गरज आहे का? सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या रूपाने आमच्या संघात असे फलंदाज आहेत जे सर्व प्रकारचे स्वीप शॉट्स खेळू शकतात. जेव्हा सूर्यकुमार आणि तिलक मैदानावर असतात तेव्हा कोणत्याही फिरकीपटूला योग्य ठिकाणी गोलंदाजी करणे सोपे नसते. पण या दोघांशिवाय राखीव फलंदाज म्हणून आपल्याकडे कोण आहे? हा प्रश्न खूप मोठा आहे.”

भारत-पाकिस्तान यादिवशी आमने-सामने
आशिया चषक 30 ऑगस्ट पालसून सुरू होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 2 सप्टेंबरला होणार आहे. स्पर्धेपूर्वीच दोन्ही संघानी आपला संघ जाहीर केला आहे. (indian batsman dinesh kartik asked questions on team india squd)

महत्वाच्या बातम्या-   
‘स्टोक्सने आयपीएलमध्येच सांगितलं होतं…’, वर्ल्डकपबाबत दिग्गजांमध्ये आधीच झाली होती चर्चा 
संघातून वगळल्यामुळे अखेर पुजाराने नाराजी व्यक्त केलीच! म्हणाला, ‘प्रत्येक वेळी मला…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---