बुधवारी (दि. 25 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. यातील वनडेतील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याला मोठा फायदा झाला आहे. यावेळी क्रमवारीमध्ये गिलने भरारी घेतली आहे. त्याने द्विशतक आणि शतक ठोकल्यानंतर क्रमवारीत मोठी उसळी मिळाली. मात्र, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली नुकसान झाले आहे. तसेच, रोहित शर्मा याने शेवटच्या वनडेत शतक ठोकल्यामुळे त्याला क्रमवारीत फायदा झाला आहे.
आयसीसी वनडे क्रमवारीतील अव्वल 10 खेळाडूंमध्ये भारताचे तीन फलंदाज सामील झाले आहेत. त्यात शुबमन गिल (Shubman Gill) हा सर्वात पुढे आहे. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा अजूनही अजूनही कायम आहे. यावेळी क्रमवारीत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे.
आयसीसी वनडे क्रमवारीत शुबमन गिल अव्वलस्थानी
आयसीसीकडून वनडे क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याला मोठा फायदा झाला आहे. तो अव्वल 10मध्ये पहिल्यांदाच एन्ट्री करण्यात यशस्वी झाला आहे. गिल मागील क्रमवारीत अव्वल 20मध्येही नव्हता. मात्र, तो आता अव्वल 10मध्ये सहाव्या स्थानी विराजमान झाला आहे. अशात पहिल्या स्थानावरील खेळाडूबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 887 गुणांसह अव्वलस्थानी आहे. यानंतर दुसऱ्या स्थानी रस्सी व्हॅन डर ड्युसेन आहे. त्याचे 766 गुण आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी क्विंटन डी कॉक असून त्याचे 759 गुण आहेत. चौथ्या स्थानी असलेल्या डेविड वॉर्नर याचे 747 गुण आहेत.
विराट सातव्या, तर रोहित नवव्या क्रमांकावर
यापूर्वी चौथ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) होता. मात्र, आता विराटला नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्याच इमाम उल हक 740 गुणांसह तो पाचव्या स्थानी आहे. यानंतर शुबमन गिल याने सहावे स्थान पटकावले आहे. गिल याचे गुण 734 झाले आहेत. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वनडे क्रमवारी आहे. गिलनंतर सातव्या स्थानी विराट आहे. त्याचे 727 गुण झाले आहेत. आठव्या स्थानी 719 गुणांसह स्टीव्ह स्मिथ आहे. तसेच, 719 गुणांसह रोहित शर्मा हा नवव्या क्रमांकावर आहे. मागील क्रमवारीत त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेत 101 धावा चोपल्या होत्या. त्यानंतर त्याला एका स्थानाचा फायदा झाला. दहाव्या क्रमांकावर 710 गुणांसह इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो आहे. (indian batsman in icc odi ranking shubman gill at 6 virat kohli at 7 rohit sharma at 9 read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराजच्या शिरपेचात मानाचा तुरा, भल्याभल्यांना पछाडत वनडे रँकिंगमध्ये बनला अव्वल गोलंदाज
रोहितच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची ‘हिटमॅन’ने केली बोलती बंद, व्हिडिओ पाहून बत्त्या होतील गुल