आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० स्वरुपाचे आगमन झाल्यापासून क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. परंतु क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांसह स्ट्राइक रोटेट करणेही तितकेच गरजेचे असते. स्ट्राइक रोटेट केल्यामुळे अर्थातच पळून धावा काढल्यामुळे फलंदाजाला खेळपट्टीवर अधिक वेळ घालवण्याची संधी मिळत असते. मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नुसते पळून मोठ्या आकडी धावा करणे थोडे कठीण जाते.
परंतु वनडेत एकही चौकार आणि षटकार न मारता पळून कोणी शतक केल्याचे तुम्ही पहिले आहे का? असा कारनामा भारतीय संघातील एका फलंदाजाने केला आहे. चला तर पाहूया कोण आहे तो फलंदाज?
भारतीय संघाने गेल्या काही वर्षात वनडे क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याचे मुख्य कारण त्यांची फलंदाजी आहे. या फलंदाजीचा मुख्य स्तंभ कर्णधार विराट कोहली आहे. विराट कोहलीने खेळाच्या तिनही स्वरुपात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यात एका खास विक्रमाचीदेखील नोंद आहे. विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये एकही चौकार आणि षटकार न लगवता १०० धावा केल्या आहेत.
हा खास विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केला होता. या सामन्यात त्याने १५९ चेंडूत १६० धावांची संयमी खेळी केली होती. यामध्ये त्याने १२ चौकार आणि २ षटकार लगावले होते. म्हणजेच त्याने १०० धावा पळून पूर्ण केल्या होत्या. अशाप्रकारे एमएस धोनी, सचिन तेंडूलकर यांसारखे दिग्गज फलंदाजही जो विक्रम करु शकले नाहीत, तो विराट कोहलीने एकट्याने केला आहे.
विराट कोहलीव्यतिरिक्त मैदानात पळून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू गॅरी कर्स्टनच्या नावावर आहे. त्याने युएई संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत १८८ धावांची खेळी केली होती. यापैकी ११२ धावा त्याने पळून पूर्ण केल्या होत्या.
विराट कोहलीची वनडे क्रिकेटध्ये उल्लेखनीय कामगिरी
विराट कोहलीच्या वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण २५४ सामने खेळले आहेत. यात त्याने ५९.१ च्या सरासरीने १२१६९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४३ शतक आणि ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १८३ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानावर दुखापत झाल्याने ‘या’ तीन खेळाडूंना गमावावे लागले प्राण, एका भारतीयाचाही समावेश
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिकिटाची किंमत गगनाला भिडली, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
आता रणजी खेळाडू देखील होणार करारबद्ध? आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी माजी फलंदाजाचा सल्ला






