भारतीय उपखंडातील खेळपट्ट्या (विशेषतः भारत, श्रीलंका आणि बंगलादेशमधील) या फिरकी गोलंदाजीला पुरक असतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या खेळपट्ट्यावर भारतीय फलंदाजांचे तंत्र पक्के असणार, हा समज आहे. पण या समजाला तडा देण्याचं काम ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी केलं आणि ऑस्ट्रेलियाने इंदोर येथे झालेल्या बॉर्डर-गवसकर ट्रॉफीसाठी च्या तिसऱ्या सामन्यात दिमाखदार विजय नोंदवला.
मागील दोन्ही कसोटी सामन्यांत नाणेफेक गमावूनही दोन्ही सामने भारताने जिंकले. अशात या तिसऱ्या सामन्याची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारत मोठी धावसंख्या अरेल, अशी अपेक्षा होती. पण पहिल्या डावात भारताने असताना 33 षटकांमध्ये केवळ 109 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. यामुळे भारतीय फलंदाजांनी म्हणा किंवा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांनी म्हण, ऑस्ट्रेलियाला या कसोटीवर वर्चस्व मिळवून दिली. भारताच्या सलामी जोडीबरोबरच इतर फलंदाजानीही निराशा केली. लय हरवलेल्या केएल राहुल याच्या जागी सलामीला आलेल्या शुबमन गिल याला संधीचे सोने करता आले नाही.
याउलट गोलंदाजांनी निर्माण केलेल्या संधीचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सलामीला आलेल्या उस्मान ख्वाजा याच्या बहुमोल अर्धशतकाबरोबरच मार्नस लाबुशेन आणि स्टीव स्मिथ यांच्या उपयुक्त खेळींनी हातभार लावला. परिणामी पहिल्या डावात संघाची धावसंख्या 197 पर्यंत पोहोचली आणि संघाने 88 धवांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ही 88 धावांची पिछाडी काढता काढता भारताचे आघाडीचे 4 फलंदाज बाद झाले आणि इथेच ऑसी संघाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले. पुजाराने केलेल्या संयमी अर्धशतकामुळे भारताला संघर्षाची संधी मिळाली. पण दुसरीकडे फलंदाज बाद होत गेले आणि भारत ऑसी संघासमोर विजयासाठी केवळ 75 धावांचे आव्हान उभे करू शकला. हे आव्हान ऑसी संघाने आरामात पूर्ण केले.
झटपट क्रिकेटमुळे भारतीय फलंदाजांचे कसोटी खेळण्याचे तंत्र कमकूवत झाले आहे, असं म्हणण्यास वाव वाटावा अशी फलंदाजी भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात केली. ऑसी फिरकीपट्टूनी केलेली कामगिरी नजरेत भरणारी आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकही क्रिज लाईनचा ‘नो बॉल ‘ न टाकलेल्या लायॉन याने आपण जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहोत हे परत एकदा सिद्ध केले. लायनने पहिल्या डावात 3 व दुसऱ्या डावात 8 गडी बाद करत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. भारतीय गोलंदाजांनी लौकीकाला साजेशी कामगिरी केली पण फलंदाजांच्या अपयशामुळे हा सामना भारतीय संघाला गमवावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या हुशारीवर भडकले शास्त्री गुरुजी, इंदोर कसोटीतील पराभवानंतर खोलली टीम इंडियाची पोल
ब्रेकिंग! संघाला टी20 वर्ल्डकपमध्ये घेऊन जाणाऱ्या कर्णधाराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती