---Advertisement---

संघाला टी20 वर्ल्डकपमध्ये घेऊन जाणाऱ्या कर्णधाराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

On: शुक्रवार, मार्च 3, 2023 5:52 PM
---Advertisement---

क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. यूएई संघाला आपल्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक 2022साठी पात्र ठरवणाऱ्या अहमद रझा याने तडकाफडकी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. अहमद आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. तो त्याच्या राष्ट्रीय संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग होणार असून सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

अहमद रझा (Ahmed Raza) याने सोशल मीडियावर एक नोट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. त्याने ट्वीट करत लिहिले की, “अभिमानाने मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करत आहे. खूप विचार केल्यानंतर माझा असा विश्वास आहे की, हा त्या खेळापासून दूर जाण्याची योग्य वेळ आहे, ज्याने मला 17 वर्षांमध्ये इतके प्रेम आणि सन्मान दिला आहे. क्रिकेटच्या महान खेळामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि त्याचे नेतृत्व करणे माझ्या सर्वात मोठ्या सन्मानापैकी एक आहे. मी बोर्ड, सहकारी, प्रशिक्षक, निवडकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या दिवंगत वडिलांना धन्यवाद देऊ इच्छितो, ज्यांनी मला पाठिंबा दिला. तसेच, मला माझे स्वप्न पूर्णपणे जगण्यासाठी सक्षम बनवले.”

पुढे त्याने लिहिले की, “याव्यतिरिक्त माझी आई, माझे भाऊ-बहीण आणि माझे मित्र, जे या सर्वांमार्फत तिथे होते. शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी पत्नी मेहरीनसाठी, जी मागील काही वर्षांमध्ये माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम राहिली आहे. मागील 17 वर्षांतील एका क्षणाकडे लक्ष देणे कठीण आहे. मात्र, यूएईला टी20 विश्वचषकात नेणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानास्पद कामगिरी राहील.”

यूएई क्रिकेटने केला अहमदच्या नव्या भूमिकेचा खुलासा
यूएई क्रिकेटने त्यांच्या खेळाडूला शानदार कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, सहाय्यक प्रशिक्षकाच्या नवीन भूमिकेसाठी स्वागतही केले. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “शानदार कारकीर्दीसाठी शुभेच्छा अहमद रझा. आम्ही तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही यूएईच्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या रूपात तुझ्या भूमिकेसाठी तुझे स्वागत करतो.”

अहमदची कारकीर्द
अहमदने फेब्रुवारी 2014मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्याने कारकीर्दीत 56 सामन्यात 64 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान 26 धावा देत 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती. तसेच, त्याने फलंदाजी करताना 409 धावा केल्या. यामध्ये 1 अर्धशतकाचाही समावेश आहे. रझाने एकूण 55 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 37 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 19 धावा देत 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे. या क्रिकेट प्रकारात त्याच्या नावावर 122 धावा आहेत. त्याने मागील वर्षीपासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामने खेळला नव्हता. (former uae captain ahmed raza announced retirement forms cricket read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन जिनियस! वॉ-पॉंटिंगला न जमलेली कामगिरी स्मिथने पाचव्याच सामन्यात करून दाखवली
ऑस्ट्रेलियाकडून पराभव मिळाल्यानंतर रोहित शर्माने पाकिस्तानला केले ट्रोल! नेमकं काय म्हणाला भारतीय कर्णधार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---