शुक्रवारी (दि. 03 मार्च) इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच शेवट झाला. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया संघाने 9 विकेट्सने खिशात घातला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले. सोबतच या मालिकेत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत असलेल्या स्टीव्ह स्मिथ याने ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून एक शानदार कामगिरी करत रिकी पॉंटिंग याला मागे टाकले.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात 163 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी 76 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटी (Indore Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फक्त एक बळी गमावत 18.5 षटकातच 78 धावा करून सामना जिंकला. यासोबतच स्मिथ हा भारतात दोन कसोटी सामने जिंकणारा पाचवा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला.
स्मिथ या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार नव्हता. मात्र, पॅट कमिन्स कौटुंबिक कारणाने मायदेशी गेल्यानंतर त्याच्याकडे तिसऱ्या सामन्यात नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली. त्याने ही जबाबदारी निभावताना ऑस्ट्रेलियाला मालिकेत पुनरागमन करून दिले. यापूर्वी स्मिथने 2017 दौऱ्यावेळी भारतात ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी पुणे कसोटी जिंकण्यात त्याच्या संघाला यश आलेले. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कर्णधार म्हणून ओळखला जाणारा स्टीव्ह वॉ कर्णधार म्हणून भारतात केवळ एक सामना जिंकू शकलेला. तर, पॉंटिंगने सात सामन्यात भारतभूमीवर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. मात्र, यामध्ये त्याला एकही विजय मिळवता आला नाही.
भारतात आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक कसोटी विजय मिळवून देणारे कर्णधार म्हणून बिल लॉरी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने भारताला भारतात तीन वेळा पराभूत करण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर रिची बेनो, इयान जॉन्सन व ऍडम गिलख्रिस्ट यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने भारतात दोन कसोटी सामने जिंकले होते.
(Steve Smith Won Two Test On Indian Soil Ricky Ponting And Steve Waugh Not Won More Than One In Border-Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेस्सीचा जीव धोक्यात! कुटुंबाच्या सुपरमार्केटवर हल्लेखोरांकडून गोळीबार, स्टार फुटबॉलपटूला धमकी
ब्रेकिंग! विश्वचषकात विक्रमी खेळी करणारा दिग्गज फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड, क्रीडाविश्वावर शोककळा