क्रिकेटमध्ये फलंदाजांनी शतक झळकावणे ही एक मोठी कामगिरी आहे. बऱ्याच वेळा फलंदाजे शतक काही धावांनी हुकत. जर फलंदाज ९० ते १०० धावांच्या दरम्यान बाद झाला असले तर ते अत्यंत दुर्दैवी मानले जाते. त्यातच जर तो ९९ धावांवर बाद झाला असेल तर अशुभ मानलं जातं.
आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज ८६ वेळा ९९ धावांवर बाद झाले आहेत. या व्यतिरिक्त १० वेळा फलंदाज १९९ धावांवर बाद झाले आहेत. १९९१ मध्ये न्यूझीलंडचा माजी फलंदाज मार्टिन क्रो (Martin Crowe) ह्यांनी श्रीलंकेविरुद्ध २९९ धावांवर बाद होऊन अनपेक्षित विक्रम नोंदवला.
भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत १० वेळा फलंदाज ९९ धावांवर आणि २ वेळा १९९ धावांवर बाद झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकही भारतीय फलंदाज ९९, १९९ किंवा २९९ ह्या धावसंख्येवर नाबाद राहिलेला नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे १० फलंदाज ९९ धावांवर धावांवर शिकार झाले आहेत.
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दोन वेळा हा नकोसा विक्रम केला आहे.
कसोटीत ९९ धावांवर बाद झालेल्या भारतीय फलंदाजांवर एक नजर टाकू.
१. पंकज रॉय (Pankaj Roy) – वि. ऑस्ट्रेलिया १९५९-दिल्ली
भारतीय संघाचे माजी सलामीवीर पंकज रॉय कसोटी क्रिकेटमध्ये ९९ धावांवर बाद झाले आणि ते ९९ धावांवर बाद होणारे पहिले भारतीय फलंदाज होते.
डिसेंबर १९५९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दिल्ली कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात पंकज ९९ धावांवर बाद झाले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला एक डाव राखून १२७ धावांनी पराभूत केले होते.
२. एमएल जयसिंहा (M L Jaisimha) – वि. पाकिस्तान १९६०-कानपूर
भारताने डिसेंबर १९६० मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेट मालिका कानपूर येथे खेळली. त्या मालिकेच्या दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एमएल जयसिंहा ९९ धावांवर बाद झाले होते. पाकिस्तान आणि भारत यांच्यात खेळलेला हा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.
३. अजित वाडेकर (Ajit Wadekar) – वि. ऑस्ट्रेलिया १९६७-मेलबर्न
१९६७-६८ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. दुसर्या कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात अजित वाडेकर ९९ धावांवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत भारताला एक डाव आणि ४ धावांनी पराभूत केले होते.
४. रुसी सुरती (Rusi Surti) – वि. न्यूझीलंड १९६८-ऑकलंड
मार्च १९६८ मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंडमध्ये चौथा कसोटी सामना खेळाला. या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात रुसी सुरती ९९ धावांवर बाद झाले होते. त्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला २७२ धावांनी पराभूत करून ४ सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकून इतिहास रचला होता.
५. नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) वि. श्रीलंका १९९४-बेंगळुरू
१९९४ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ कसोटी सामन्याची मालिका भारतामध्ये झाली. या मालिकेच्या दुसर्या कसोटी सामन्यातील एकमेव डावात नवजोत सिंह सिद्धू ९९ धावांवर बाद झाले. हा सामना बंगळुरूमध्ये खेळाला गेला. त्यात भारताने श्रीलंकेला एक डाव आणि ९५ धावांनी पराभूत केले होते.
६. सौरव गांगुली (Sourav Ganguly) वि. श्रीलंका १९९७-नागपूर
श्रीलंकेविरुद्ध १९९७ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेच्या दुसर्या सामन्यात सौरव गांगुली ९९ धावांवर बाद झाला. नागपूरमध्ये ही कसोटी खेळली गेली. पावसामुळे ह्या सामन्यात भारतीय संघाचा फक्त एकच डाव पूर्ण झाला, ज्यामध्ये त्यांनी ४८५ धावा केल्या.
७. सौरव गांगुली (Sourav Ganguly) वि. इंग्लंड २००२-नॉटिंगहॅम
२००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सौरव गांगुली दुसऱ्यांदा ९९ धावांवर बाद झाला. सौरव गांगुली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे जो कसोटी क्रिकेटमध्ये ९९ धावांवर दोनदा बाद झाला. नॉटिंगहॅम कसोटीच्या दुसर्या डावात सौरव गांगुलीने हा नकोसा विक्रम केला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला हा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
८. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) वि. श्रीलंका २०१०-कोलंबो
२०१० मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या दुसर्या सामन्याच्या पहिल्या डावात वीरेंद्र सेहवाग ९९ धावांवर बाद झाला. कोलंबोमध्ये श्रीलंका आणि भारत यांच्यातील हा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
९. एमएस धोनी (MS Dhoni) वि. इंग्लंड २०१२-नागपूर
२०१२ मध्ये नागपुर येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एमएस धोनी ९९ धावांवर बाद झाला. इंग्लंड भारत यांच्यातील हा कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि इंग्लंड संघाने मालिका २-१ अशी जिंकली होती.
१०. मुरली विजय (Murali Vijay) वि. ऑस्ट्रेलिया २०१४-अॅडिलेड
२०१४ मध्ये, मुरली विजय हा भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात ९९ धावांवर बाद झाला. अॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ४८ धावांनी पराभूत केले.