भारतीय संघाची फलंदाज पूनम राऊत हिने भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांदरम्यानच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. तिच्या एका निर्णयामुळे तिचे खूप कौतुक होत आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंचाने नाबाद दिल्यानंतरही पूनम राऊत मैदान सोडून बाहेर गेली. तिच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटले.
ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी मॉलिनेक्स भारताच्या डावातील ८१ वे षटक टाकत होती. या दरम्यान, तिचा एक चेंडू खूप वेगात वळला, जो पूनमला चांगल्या प्रकारे खेळता आला नाही. या दरम्यान मॉलिनेक्सने जबरदस्त अपील केले पण पंचांनी पुनमला नाबाद घोषित केले. पण असे असूनही भारतीय फलंदाज मैदानाबाहेर गेली. तिच्या या निर्णयाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह सर्वांनाच धक्का बसला आहे.
पूनम या सामन्यात चांगल्या लयीमध्ये दिसत होती. या दरम्यान, तिने हळूवार फलंदाजी करताना स्म्रीती मंधनासोबत शतकी भागीदारी केली. ३६ धावा केल्यावर ती बाद झाली. पूनमने तिच्या डावादरम्यान दोन चौकार लगावले. पूनमने तब्बल १६५ चेंडू खेळून काढले.
– Appeal for caught behind
– Given not out…
But Punam Raut walks! #AUSvIND pic.twitter.com/Q9fzVuh5Zt
— 7Cricket (@7Cricket) October 1, 2021
ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनी, या घटनेनंतर लगेचच मायक्रोफोनवर समलोचकांशी बोलत होती, ती म्हणाली की राऊतच्या बॅटने चेंडूला स्पर्श केला की नाही याची मला खात्री नाही. जेव्हा मूनीला विचारण्यात आले की ती अशा प्रकारे मैदानाबाहेर गेली असती का? तेव्हा ऑस्ट्रेलियन सलामीवीर म्हणाली, ‘अजिबात नाही कारण पंचाने ‘बाद’ दिलेले नाही.’
भारताची माजी यष्टीरक्षक फलंदाज सबा करीम यांनी पूनम राऊतचा निर्णय विचित्र असल्याचे म्हटले आहे. एका वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, हा एक अतिशय विचित्र निर्णय आहे. कारण या कसोटी सामन्यात ‘डीआरएस’ नाही.’ त्याचवेळी माजी महिला क्रिकेटपटू नुशीन अल खादीर म्हणाल्या, पूनमला आता पश्चाताप होणार नाही, अशी आशा आपण बाळगू.
सचिनने दाखवली होती खिलाडूवृत्ती
पूनमप्रमाणे यापूर्वी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही अशा प्रकारे खिलाडूवृत्ती दाखवली होती. त्याने २०११ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला रवी रामपॉलच्या गोलंदाजीवर नाबाद घोषित केले होते. पण, तरीही सचिन २ धावांवर असूनही खिलाडूवृत्ती दाखवून मैदानातून बाहेर गेला होता.
https://www.instagram.com/reel/CT2fCmWF4or/?utm_medium=copy_link
भारत मजबूत स्थितीत
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटीत भारतीय संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताने दुसऱ्या दिवशी ५ गडी बाद २७६ धावा केल्या आहेत. सध्या खराब हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. दीप्ती शर्मा १२ धावांवर नाबाद आहे, तर तान्या भाटियाने अद्याप आपले खाते उघडलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
AUSW vs INDW: दुसऱ्या दिवशीही पावासाचा व्यत्यय, पण मंधनाच्या शतकामुळे भारतीय संघ भक्कम स्थितीत
उत्तर प्रदेश संघाच्या प्रशिक्षकपदी ‘या’ माजी खेळाडूची नियुक्ती, आयपीएलमधील प्रशिक्षणाचा आहे अनुभव
टी२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारे ५ फलंदाज, भारताच्या ‘रनमशीन’चाही समावेश