सध्या भारतात वनडे विश्वचषक खेळला जात आहे. स्पर्धेचा जवळपास अर्धा टप्पा पार पडला असून, सर्व संघांनी प्रत्येकी चार किंवा पाच सामने तरी खेळले आहेत. ही स्पर्धा भारतात होत असताना फलंदाज मोठ्या प्रमाणात धावा काढताना दिसतायेत. स्पर्धेत तब्बल दीडशे खेळाडू सहभागी झाले असताना फलंदाजीत मात्र भारताच्या तीन फलंदाजांनी आपला जलवा कायम राखला आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतीय संघाने या अपेक्षेवर खरे उतरत सलग पाच सामन्यात विजय मिळवत, गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांनी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसते.
विराट कोहली हा सध्या स्पर्धेत दुसरा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये तीन अर्धशतके व एका शतकासह 118 च्या सरासरीने 354 धावा काढल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने आत्तापर्यंत पाच सामन्यात मिळून 311 धावा केल्या आहेत. रोहित या स्पर्धेत बाउंड्रींचे अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत तब्बल 17 षटकार व 33 चौकार मारले आहेत. तर भारताचाच फलंदाज केएल राहुल या स्पर्धेत सर्वाधिक 177 च्या सरासरीने धावा काढतोय.
गोलंदाजीचा विचार केल्यास मोहम्मद शमी याने स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वात्कृष्ट स्पेल टाकला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 54 धावा देताना पाच बळी मिळवले होते. तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजी सरासरीमध्ये शमी आणि बुमराह हेच पहिल्या दोन्ही क्रमांकावर दिसून येतात.
(Indian Batters Dominating In 2023 ODI World Cup Virat And Rohit At Top)
हेही वाचा-
पाकिस्तानच्या पराभवानंतर चिडला शोएब अख्तर; म्हणाला, ‘बाबरमध्ये स्टॅमिना…’
वानखेडेवरील SA vs BAN सामन्यात खेळपट्टी कुणाची देणार साथ? वाचा हवामान ते आकडेवारीविषयी सर्वकाही