---Advertisement---

पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के! आधी रीझा, मग ड्युसेन स्वस्तात बाद; फक्त…

Reeza-Hendricks-Rassie-Van-Der-Dussen
---Advertisement---

बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी पहिल्या 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच, आता चौथ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचा पाचवा सामना बांगलादेशविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) बांगलादेश संघाविरुद्ध खेळला जात आहे. मात्र, पॉवरप्लेमध्येच त्यांना दोन धक्के बसले आहेत. बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत संघासाठी विकेट्स मिळवून दिल्या.

पॉवरप्लेमध्येच दोन विकेट्स
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. दक्षिण आफ्रिकेकडून डावाची सुरुवात करण्यासाठी क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स (Reeza Hendricks) मैदानात उतरले होते. मात्र, यावेळी हेंड्रिक्सला फार काळ मैदानावर टिकता आले नाही. त्याला 12 धावांवर तंबूचा रस्ता पकडावा लागला. डावातील सातवे षटक टाकण्यासाठी आलेल्या शोरिफुल इस्लाम याने पहिल्याच चेंडूवर त्याला त्रिफळाचीत बाद केले. यानंतर त्याने शानदार सेलिब्रेशनही केले.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1716741351860273584

ड्युसेन स्वस्तात बाद
त्यानंतर तिसऱ्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या रासी व्हॅन डर ड्युसेन (Rassie van der Dussen) हादेखील स्वस्तात बाद झाला. त्याने 7 चेंडू खेळून फक्त 1 धाव केली. त्याला 8वे षटक टाकत असलेल्या मेहिदी हसन मिराज (Mehidy Hasan Miraz) याने पाचव्या चेंडूवर पायचीत बाद केले.

अशाप्रकारे दक्षिण आफ्रिका संघाला पॉवरप्लेमध्ये 2 विकेट्स गमावत फक्त 44 धावा करता आल्या. (Shoriful Islam and Mehidy Hasan Miraz take south africa’s two important wicket for afghanistan)

विश्वचषकातील 23व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्कराम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विलियम्स

बांगलादेश
तंजीद हसन, लिटन दास, नजमुल होसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहिदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, हसन महमूद

हेही वाचा-
दहा संघांचा वर्ल्डकप, मात्र गाजवतायेत टीम इंडियाचेच वाघ
पाकिस्तानच्या पराभवानंतर चिडला शोएब अख्तर; म्हणाला, ‘बाबरमध्ये स्टॅमिना…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---