चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअम येथे अफगाणिस्तान संघाने ऐतिहासिक विजय साकारत पाकिस्तानला 8 विकेट्सने नमवले. हा वनडे क्रिकेटमधील अफगाणिस्तानचा पाकिस्तानविरुद्ध पहिलाच विजय आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 22व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 283 धावांचे आव्हान अफगाणिस्तानने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 286 धावा करत पूर्ण केले. या धमाकेदार विजयानंतर अफगाणिस्तानने विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबल हलवून टाकला. त्यांनी यामध्ये मोठी झेप घेत पाकिस्तानची बरोबरी केली.
अफगाणिस्तानची गरुडझेप
अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने पाकिस्तान (Pakistan) संघाची धूळधाण उडवल्यानंतर विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्येही (World Cup 2023 Points Table) मोठा उलटफेर झाला. अफगाणिस्तान संघ पॉईंट्स टबेलमध्ये आता 10व्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी पोहोचला आहे. म्हणजेच एका विजयासह अफगाणिस्तानला चार स्थानांचा फायदा झाला आहे. मात्र, पराभवानंतरही पाकिस्तान संघ पाचव्या स्थानीच कायम आहे. विश्वचषकातील हा पाकिस्तानचा तिसरा पराभव आहे आणि त्यांचा प्रवास खडतर होत चालला आहे.
अफगाणिस्तान संघाच्या विजयामुळे गतविजेत्या इंग्लंड (England) संघाला मोठे नुकसान झाले आहे. इंग्लंड पॉईंट्स टेबलमध्ये तळाशी म्हणजेच दहाव्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे, श्रीलंका संघ नवव्या, तर नेदरलँड्स आठव्या स्थानी आहे. तसेच, सातव्या स्थानी बांगलादेश संघ आहे.
अव्वलस्थानी भारत
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी भारतीय (Team India) संघाने बस्तान बसवले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत खेळलेल्या सर्व पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, दुसऱ्या स्थानी न्यूझीलंड आहे. त्यांना पाच सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय मिळवता आला आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आणि चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे.
Live points Table #CWC23 pic.twitter.com/xXeN1Nqps4
— Riyan Shahid (@RiyanShahid9955) October 24, 2023
अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय
अफगाणिस्तान संघाने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानकडून मिळालेल्या 283 दावांचे आव्हान अफगाणिस्तानने 49व्या षटकातच फक्त 2 विकेट्स गमावून पूर्ण केले. यावेळी संघाकडून रहमानुल्लाह गुरबाज (65), इब्राहिम जादरान (87) यांनी वादळी खेळी साकारली. त्यांच्यानंतर संघाचा डाव रहमत शाह (77) आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (48) यांनी नाबाद राहून सांभाळला. रहमत आणि शाहिदीमध्ये तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 96 धावांची भागीदारी झाली. तसेच, पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला. (world cup 2023 afghanistan made big jump in latest points table after pak vs afg match)
हेही वाचा-
‘मी स्पर्धेच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो…’, पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्यानंतर अफगाणी कर्णधाराचे मोठे विधान
अफगाणिस्तानने पराभवाची धूळ चारताच भडकला Babar Azam, थेट ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार; म्हणाला, ‘फ्लॉप…’