भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिका सुरु व्हायला अवघा एक दिवस राहिलाय. दोन्ही संघांमध्ये 4 डिसेंबरला पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाईल. यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये पोहोचला आहे. मात्र, अशातच एक हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. भारतीय संघाच्या काही खेळाडूंना बांगलादेशमध्ये पोहचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भारतीय गोलंदाज दीपक चहर यानेे ट्वीट करत या घटनेची माहिती दिली.
भारतीय संघाचे काही खेळाडू अद्याप बांगलादेशमध्ये पोहचलेले नाहीत. अशातच, दीपक चहर याने मलेशियन एअरलाईन्ससोबत प्रवासचा अनुभव शेअर केला आहे. ज्यात त्याला अनेक अडचणींचा सोमोरे जावे लागले. तो ट्वीटरवर म्हणाला की, “मलेशियन एअरलाईन्ससोबत प्रवास करण्याचा अनुभव खूप खराब होता. आधी त्यांनी आम्हाला पूर्वसुचना न देता आमची फ्लाईट बदलण्यात आली. याशिवाय बिझनेस क्लासमध्ये जेवण देखील नव्हते. आता आम्ही मागच्या 24 तासापासून आमच्या सामनाची वाट पाहत आहोत. विचार करा की आम्हाला उद्या सामना खेळायचा आहे.”
https://twitter.com/deepak_chahar9/status/1598874533616029696?s=20&t=svwpTvjsf5pwy6PWZmFGBw
न्यूझीलंड संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतासाठी बांगलादेश दौरा महत्वाचा असणार आहे. टी20 विश्वचषकानंतर काही खेळाडूंना आराम देण्यात आलेला. मात्र, या मालिकेत काही खेळाडूंवर लक्ष असणार आहेे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या प्रदर्शनावर सर्वांच्या नजरा असणार आहेे. हे दोन्ही फलंदाज टी-20 विश्वचषकात अयशस्वी ठरले होते. त्यानंतर त्यांना बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला. मात्र, आता बांगलादेश दौऱ्यावर भारतीय सलामीवीरांचे प्रदर्शन कसे राहिल हे बघण्यासारखे असेल.
टी20 विश्वचषकात भारतीय सलामीवारांचे प्रदर्शन अत्यंत खराब झाले. टी20 विश्वचषकानंतर भारताच्या दोन्ही सलामीवीरांना विश्रांती देण्यात आली होती. विश्रांतीनंतर ते पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रदर्शनावर सगळ्यांचे लक्ष असणार आहे.(Indian Bowler Deepak Chahar showed his resentment towards Malaysian Airlines for inconvenience)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड दिग्गजाच्या ‘त्या’ ट्वीटवर पाकिस्तानी चाहते भडकले! म्हणाले, ‘काल पण हीच पीच होती ज्यावर…’
राष्ट्रकुल विजेता लक्ष सेन संकटात! गंभीर प्रकरणात एफआयआर दाखल