fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

युवराजच्या पावलावर पाऊल ठेवत विदेशातील लीग खेळण्यासाठी हा क्रिकेटर घेणार संन्यास

मुंबई । भारताचा दिग्गज फिरकीपटू प्रवीण तांबे याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, पण त्याने फ्रेंचायजी क्रिकेट लीगमध्ये खूपच नाव कमावले. वयाच्या  41 वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करुन सगळ्यांना चकित केले होते. तसेच आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो सर्वात अधिक वयस्कर खेळाडू आहे. 48 वर्षीय प्रवीण तांबेने कोलकाता नाइट रायडर आपल्या संघात घेतले होते. मात्र, बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याचे त्याला त्याचे नाव लीगमधून माघारी घ्यावे लागले.

केकेआरच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळण्यास नकार देणाऱ्या बीसीसीआयने प्रवीण तांबेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की,” मागील वर्षी अबुधाबी येथे झालेल्या टी10 लीगमध्ये बीसीसीआयच्या परवानगीविना खेळताना दिसून आला. त्यामुळे त्याला भारतीय लीगमध्ये खेळण्यास नकार देण्यात आला.”

फिरकी गोलंदाज प्रवीण तांबे याला आता कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे. सीपीएलमधील होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी त्याने आपले नाव पाठवले आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी त्याने बीसीसीआयकडे परवानगी मागितली आहे. पण त्याला या लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआय परवानगी देण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे प्रवीण तांबे युवराज सिंगच्या पावलावर पाऊल ठेवत विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसेल. तसेच तो भारतातील लीग आणि स्थानिक सामन्यांना ‘बायबाय’ करू शकतो.

बीसीसीआयच्या नियमानुसार, खेळाडूने आयपीएल आणि स्थानिक क्रिकेट सामन्यातून निवृत्ती घेतल्यानंतरच त्याला दुसऱ्या देशातील टी 20 लीगमध्ये खेळण्यास परवानगी मिळते.

युवराज सिंगला देखील कॅनडा येथे झालेल्या ग्लोबल टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी निवृत्ती घ्यावी लागली. आता प्रवीण तांबे ही युवराजसिंग सारखेच करणार आहे.

प्रवीण तांबेने आयपीएलच्या 33 सामन्यात 28 बळी टिपले आहेत. त्याचे सध्याचे वय 48 वर्षं असूनही तो अजूनही क्रिकेट खेळत आहे.

You might also like