ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेला भारतीय संघ १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिल्या सराव सामन्याला ६ डिसेंबरपासून सिडनीच्या ड्रममोयन ओवल मैदानावर सुरुवात झाली.
या सामन्यात भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २४७ धावांवर आपला डाव घोषित केला. दुसर्या डावात भारतीय संघ गोलंदाजी करत असताना भारताचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनबाबत एक मजेशीर घटना घडली.
“अश्विनला टोपी फारच प्रिय असावी”
भारतीय संघ गोलंदाजी करत असताना ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन १८ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. मात्र यावेळी एक मजेशीर गोष्ट घडल्याचे दिसून आले. सहसा खेळाडू गोलंदाजी करताना आपली टोपी काढून गोलंदाजी करत असतात. मात्र या सामन्यात अश्विन डोक्यावर टोपी ठेवून गोलंदाजी करत असताना दिसला.
खेळाडू गोलंदाजी करताना आपली टोपी किंवा स्वेटर पंचांकडे देत असतात. परंतु आयसीसीने कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन सध्याच्या काळातील सामन्यांमधे पंचांकडे खेळाडूंनी कुठलीही साधने देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे खेळाडू गोलंदाजी करताना आपली टोपी संघसहकाऱ्याकडे सोपवत असल्याचे अलीकडच्या सामन्यांत दिसून आले.
मात्र अश्विनने कुठल्याही सहकाऱ्याकडे टोपी न देता आपल्याच डोक्यावर ठेवणे पसंत केले. हे पाहून क्रिकबझ संकेतस्थळाचे वार्ताहर भरत सुंदरेशन ह्यांनी मजेशीर ट्विट केले आहे. अश्विन टोपीसह गोलंदाजी करत असतानाचा फोटो टाकत त्यांनी “अश्विनला आपली टोपी सहकाऱ्यांना देणे बहुधा आवडत नसावे”, अशी कॅप्शनही दिली आहे.
R Ashwin doesn’t like giving his cap to a teammate it looks like. He’s bowling with his cap on #AUSAvIND #ausvind pic.twitter.com/76ZOnBfuzP
— Bharat Sundaresan (@beastieboy07) December 7, 2020
रहाणेचे शतक; उमेश यादव, रवीचंद्रन अश्विनची प्रभावी गोलंदाजी
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने ९ बाद २४७ धावांवर आपला डाव घोषित केला. यात अजिंक्य रहाणेच्या नाबाद ११७ धावांच्या खेळीचा सिंहाचा वाटा होता. त्याला चेतेश्वर पुजाराच्या ५४ धावांच्या खेळीची साथ लाभली.
दुसर्या डावात गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज उमेश यादवने नवीन चेंडूने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ११ षटकांत २८ धावा देत २ गडी बाद केले. ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने देखील ४० धावांत २ बळी घेत ऑस्ट्रेलिया अ संघाच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला. आत्तापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलिया अ संघाने ४६ षटकांत ५ बाद १६६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
स्टिव्ह वॉ यांच्या २१ वर्षीय मुलाने घेतला क्रिकेटमधून ब्रेक; भारताविरुद्ध खेळला होता सामना
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग