नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने अॅलस्टर कूकला दुसऱ्यांदा बाद केले. त्याने आज कूकला १७ धावांवर असताना राहुलकडे झेल द्यायला भाग पाडले.
याबरोबर त्याने कसोटीत ११व्यांदा कूकला बाद करण्याचा पराक्रम केला.
या मालिकेत इशांत शर्माने ३ सामन्यातील ५ डावात ११ विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी तीन डावात त्याने अॅलस्टर कूकला बाद केले आहे.
कारकिर्दीत तब्बल ११वेळा इशांत शर्माने या खेळाडूला तंबुत पाठवले आहेत. यापुर्वी एखाद्या ठराविक फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा पराक्रम भारतीय खेळाडूंमध्ये कपिल देव आणि हरभजन सिंगच्या नावावर आहे.
कपिल देव यांनी मुदसर नजर(१२), ग्रॅम गुच (११), डेविड गोव्हर (१०), अॅलन बाॅर्डर (१०) आणि माल्कम मार्शल (१०) यांना कसोटी कारकिर्दीत १० पेक्षा जास्तवेळा बाद केले होते तर हरभजन सिंगने रिकी पाॅटिंगला १०वेळा बाद केले आहे.
जर या मालिकेत इशांत राहिलेल्या ५ डावात अॅलस्टर कूकला दोन वेळाही बाद करु शकला तर तो कपिल देव यांच्या या मोठ्या पराक्रमाची बरोबरी करेल.
इशांत शर्मापेक्षा जास्तवेळा केवळ माॅर्ने माॅर्केलने अॅलस्टर कूकला बाद केले आहे. त्याने हा कारनामा १२ वेळा केला आहे. तर आर अश्विनने ९वेळा कूकला बाद केले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–लारा, ब्रॅडमन, पाॅटींग… सर्वांचे विक्रम किंग कोहलीने मोडले
–भारतीय महिला कबड्डी संघाचा आशियाई स्पर्धेत विजयी चौकार, साक्षी कुमारीचा अष्टपैलू खेळ
–….आणि क्रिकेटमध्ये घडला ‘बाप’ योगायोग
–विराट कोहलीने माजी कर्णधार अझरचा २७ वर्ष जुना विक्रम मोडला
–या कारणामुळे रहाणे तिसऱ्या कसोटीत चमकला
–मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने