भारत विरुद्ध पाकिस्तान संघात टी२० विश्वचषकाचा चौथा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताकडून अर्शदीप सिंगने पहिल्या काही षटकांत जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने याबरोबर अतिशय मोठा विक्रम आपल्या नावे केला.
भारतीय संघ २००७ पासून टी२० विश्वषकात खेळत आहे. आयसीसी टी२०चा हा आठवा विश्वचषक आहे. या विश्वचषकात भारताकडून दुसरे षटक अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने टाकले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने पाकिस्तानचा कर्णधार व प्रतिभावान क्रिकेटर बाबर आझमला तंबूचा रस्ता दाखवला. बाबरकडून या विश्वचषकात मोठ्या अपेक्षा होत्या. परंतू तो गोल्डन डकवर बाद झाला. गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर बाद होणे. अर्शदीपने बाबरला एलबीडब्लू अर्थात पायचीत प्रकारे बाद केले.
याबरोबर अर्शदीप सिंगने एक खास विक्रमाची बरोबर केली. स्वत:च्या पहिल्याच टी२० विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो केवळ दुसरा गोलंदाज बनला आहे. यापुर्वी असा विक्रम भारताकडून प्रग्यान ओझा (Pragyan Ojha) याने केला होता. त्याने २००९ विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध हा पराक्रम केला होता. ओझाने बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)याला बाद केले होते.
अर्शदीप सध्या २३ वर्षांचा असून त्याने १४ टी२० सामने खेळले आहे. यात त्याने २१ विकेट्स घेतल्या आहेत. एशिया कपमध्ये कॅच सोडल्यामुळे पंजाबचा हा स्टार खेळाडू मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाला होता. मध्यप्रदेशातील गुना येथे जन्म झालेल्या अर्शदीप आजपर्यंत ३७ आयपीएळ सामन्यात तुफान कामगिरी करताना ४० विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईसह ‘हे’ पाच संघ मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल, पाहा यादी
चाहते पत्नीला ट्रोल करू लागल्यामुळे शिमरन हेटमायर निराश, सोशल मीडिया पोस्टमधून झाला व्यक्त