भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आयसीसी टी२० विश्वचषकाचा (T20 World Cup) सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या व भुवनेश्वर कुमार याने यात पाकिस्तानी गोलंदाजांना अधिक धावा करण्यापासून रोखले. यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने शानदार कामगिरी केली. तसेच संघाला गरज असताना विकेट्स काढल्या. याबरोबर आजपर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला न जमलेला विक्रम त्याने केला आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने पाकिस्तानविरुद्ध ६ टी२० सामन्यात खेळताना तब्बल ११ विकेट्स घेतल्या आहेत. १२च्या सरासरीने त्याने हा कारनामा केला आहे. त्याने ज्या ६ सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भाग घेतला, त्यात त्याने ५ वेळा गोलंदाजी केली. यात प्रत्येक सामन्यात त्याने एकतरी विकेट घेतली आहे. यामुळे पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज होण्याचा विक्रम हार्दिकच्या नावावर झाला आहे.
यापुर्वी हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता. भुवनेश्वरही ११ विकेट्स घेतल्या आहेत, मात्र त्याने ७ सामन्यात ही कामगिरी केली. याशिवाय प्रतिभावान गोलंदाज अर्शदिप सिंगने ६ तर माजी गोलंदाज इरफान पठाणने ६ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडून टी२०मध्ये पाकिस्तानविरुद्ध ४० खेळाडूंनी भाग घेतला आहे. त्यात २९ खेळाडूंनी एकतरी ओव्हर टाकली आहे. यात केवळ हार्दिक पंड्या व भुवनेश्वर कुमार यांनाच १० किंवा अधिक विकेट्स घेता आल्या आहेत.
पाकिस्तानविरुद्ध टी२०मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज-
११- हार्दिक पंड्या (६ सामने)
११- भुवनेश्वर कुमार (७ सामने)
६- अर्शदिप सिंग (३ सामने)
६- इरफान पठाण (३ सामने)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेलबर्नमध्ये एक लाख मुखातून गायले गेले भारताचे राष्ट्रगीत! पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
षटकार रोखण्यासाठी केएल राहुलचे पूर्ण प्रयत्न, गंभीर दुखापत होता-होता राहिली