भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल मैदानात श्रेत्ररक्षण करताना देखील चांगलाच उत्साहात असतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (23 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील राहुलने संघाच्या सहा धावा वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण तो हा षटकार रोखू शकला नाही. यादरम्यान, राहुलच्या खांद्याला गंभीर दुखापत होऊ शकत होती, पण सुदैवाने तसे काही झाल्याचे दिसले.
पाकिस्तानचा मध्यक्रमातील फलंदाज इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चांगल्या फॉर्ममध्ये होते. त्याने पाकिस्तानसाठी अर्धशतक केले. पण भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने इफ्तिखारला 51 धावांवर पायचीत पकडल्यामुळे त्याला विकेट गमवाली लागली. इफ्तिखारने या धावा 34 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने केल्या. पाकिस्तानच्या डावातील 12 व्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) गोलंदाजी करत होता. या षटकात अफ्तिखारने एकूण तीन षटकार मारले. याच षटकातील एक षटकार वाचवण्याच्या प्रयत्नात केएल राहुलने सीमारेषेजवळ चांगलीच चपळाई दाखवली, पण षटकार मात्र रोखू शकला नाही.
केएल राहुल (KL Rahul) लॉंग ऑफच्या दिशेला श्रेत्ररक्षणासाठी उभा होता. 12 व्या षटकातील चौथा चेंडू इफ्तिखार अहमदने षटकारासाठी खेळला. पण चेंडू सीमारेषेपासून खूपच जवळ पडला. तसे पाहिले तर त्याठिकाणी उभा असलेल्या राहुलने षटकार रोखण्यापेक्षा झेल घेण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसले. पण त्याला हे शक्य करता आले नाही. राहुलने चेंडू खेळला खरा, पण तो सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. ही डाईव्ह मारल्यानंतर तो ज्याठिकाणी पडला, तिथे सिमेंट असल्याचे दिसले. पण सुदैवाने राहुल थोडास अलीकडे पडल्यामुळे त्याला दुखापत झाली नाही. राहुल मागच्या काही महिन्यांमध्ये अनेकदा दुखापतीमुळे संघातून बाहेर राहिला आहे. अशात पुन्हा एकदा जर दुखापत झाली असती, तर भारतीय संघासाठी ही नक्कीच चिंतेची बाब ठरणार होती.
What a effort from kl Rahul in the field #KLRahul𓃵 #INDvsPAK2022 pic.twitter.com/mFzInKkCJd
— Deepanshu (@DEEPANSHUBUSWA7) October 23, 2022
या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
पाकिस्तान संघ-
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शान मसूद, हैदर अली, मोहम्मद नवाझ, शादाब खान, इफ्तिकार अहमद, हासिफ अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जे धोनीलाही जमलं नाही, ते रोहितनं करून दाखवलं; रेकॉर्ड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘जिंकलंस भावा’
टी20 विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे भारतीय दोनच, एक अर्शदीप तर दुसरा….