---Advertisement---

इफ्तिखार अन् मसूदच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तान दीडशेच्या पार, भारतापुढे 160 धावांचे आव्हान

IND-vs-PAK
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार सुरू आहे. रविवारी (दि. 23 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघ हा सामना आपल्या नावावर करण्यासाठी संघर्ष करत आहेत. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतापुढे 160 धावांचे आव्हान दिले. आता हा सामना जिंकण्याचे आव्हान भारतापुढे आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाकिस्तान संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 159 धावा चोपल्या. पाकिस्तानकडून या धावा करताना दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली.

https://twitter.com/BCCI/status/1584120170414415872

यावेळी पाकिस्तानकडून फलंदाजी करताना शान मसूद (Shan Masood) याने अर्धशतक केले. त्याने 42 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. या धावा करताना त्याने 5 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) यानेही अर्धशतक झळकावले. त्याने यावेळी 34 चेंडूत 51 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 चौकार आणि 4 षटकारही मारले. तसेच, केवळ शाहीन आफ्रिदी यालाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. तो 16 धावा करून तंबूत परतला. यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हा पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद होत तंबूत परतला.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांनी शानदार कामगिरी केली. या दोघांनीही प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. हार्दिकने 4 षटके गोलंदाजी करताना 30 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच, अर्शदीप यानेही 4 षटके गोलंदाजी करताना 32 धावा देत 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनीही प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे भारतीय दोनच, एक अर्शदीप तर दुसरा….
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, यष्टीरक्षक म्हणून डीकेची संघात एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---