पुणे, 18 मार्च 2024: चॅम्प एन्ड्युरन्स आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रायोजित आणि फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग यांनी प्रायोजित केलेल्या तिसऱ्या आपला पुणे सायक्लोथॉन स्पर्धेत ओम कारंडे, बिजेन कुमार, मायकेल लेहनिग, अंजली रानवडे, आर हरिणी श्री, अंजली भालिंगे यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले
स्पर्धेत ६०००हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. एलिट गटात ६० किमी प्रकारात पुरुषांमध्ये अहमदनगरच्या ओम कारंडे(०१:३१:३२से) याने प्रथम क्रमांक पटकावला, पुण्याच्या सुदर्शन देवर्डेकर(०१:३१:५२से) व सांगलीच्या अमन तांबोळी (०१:३१:६२से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात पुण्याच्या अंजली रानवडे(०१:५६:४६से) याने प्रथम क्रमांक पटकावला.
१००किमीमध्ये पुरुष गटात १६ ते ३५ वयोगटात बिजेन कुमार(०२:४४:३९से) याने विजेतेपद पटकावले. ३६ वर्षावरील गटात मायकेल लेहनिग(०२:४७:३३से) याने पहिला क्रमांक पटकावला. महिला गटात १६ ते ३५ वयोगटात आर हरिणी श्री(०३:५९:४१से) हिने, तर ३६ वर्षावरील गटात अंजली भालिंगे(०३:११:१९ से) ने विजेतेपद पटकावले.
याशिवाय पुरुष गटात हर्ष पवार(१४ ते ३५ वयोगट, ०१:२४:१९से), किरण पवार(३६ वर्षावरील गट, ०१:२५:०९से), महिला गटात अंजली निंगवाल(१४ ते ३५ वयोगट०१:३६:३१से), गौरी गुमास्ते(३६ वर्षावरील गट, ०१:३६:३६से), २५किमी प्रकारात तनिश सक्सेना(१४ ते ३५ वयोगट, ००:४१:४८से), विक्रांत आळेकर(३६ वर्षावरील गट, ००:४१:५१से), महिला गटात अनन्या उपाध्याय(१४ ते ३५ वयोगट, ००:४६:४५से), यानपिंग यान(००:४७:३१से) यांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळवले.
महाराष्ट्र सायकलिंग संघटना आणि भारतीय सायकलिंग महासंघ यांच्या पाठिंब्याने आयोजित या एलिट गटात पुरुषांसाठी ६०किलोमीटर, महिलांसाठी ३०किलोमीटर आणि महिलांसाठी मास्टर एलिट या प्रकारात तर, हौशी गटात १०किलोमीटर जॉय राईड, यांबरोबरच २५किमी,५०किमी, १००किलोमीटरच्या शर्यती पार पडल्या. याशिवाय महाराष्ट्र, पीसीपीसी, पुणे पोलिस, पीएमसी, पीसीएमसी, सदर्न कमांड, एनडीआरएफ, इंडीयन नेव्ही, बॉम्बे सॅपर्स, एएफएमसी, क्रोटरी पुणे डिस्ट्रिक्ट, तसेच अनेक कॉर्पोरेट संघांनी भाग घेतला होता.
स्पर्धेत स्पर्धकांना श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून सुरुवात झाली. पीसीएमसीमधील बाणेर, हायस्ट्रीट, ज्युपिटर हॉस्पिटल, औंध आणि अशाच निसर्गरम्य परिसरातून शर्यतीचा मार्गक्रमन होता. स्पर्धेतील विजेत्यांना १० लाख रुपयांची रोख पारितोषिके तसेच, प्रायोजकांतर्फे खास भेटवस्तू व गिफ्ट हॅम्पर देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कृष्ण प्रकाश(आयपीएस), पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, कमिशनर ऑफ कॉपोरेशन अँड रजिस्ट्रार सौरभ राव, रायफल शूटिंगमधील ऑलिम्पिक पदकविजेती अंजली भागवत, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, निवृत्त एडीजी राजेंद्र सिंग, राज्याच्या महिला व बालक विभागाचे आयुक्त प्रशांत ननावरे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, अतिरिक्त सीपी राजन शर्मा, भारतीय सायकलिंग महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंगचे उपाध्यक्ष सुमित भाटिया, रोटरी पुणे डिस्ट्रिक्ट ३१३१चे मोहन चौबल, यतिश भट, अशोक शिंदे, न्यूट्रासिटीकल मॅन ऑफ इंडियाचे संदीप गुप्ता, झुव्हेंट्स हेल्थकेअर लिमिटेडचे संचालक श्रीराम बालसुब्रमण्यम, आरआयआयएमएस इन्स्टिट्यूटचे चेअरमन सूरज शर्मा, इंजिनियर्स हॉरीझॉनचे व्यवस्थापकीय संचालक संजय सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सायक्लोथॉनचे मुख्य संयोजक रविंद्र वाणी, संजना लाल, गौरव फिरोदिया, सुष्मा कोपीकर, मेहेर तिवारी, राजश्री वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: एलिट गट: ६० किमी गट:
पुरुष:१. ओम कारंडे (अहमदनगर, ०१:३१:३२से), २.सुदर्शन देवर्डेकर (पुणे, ०१:३१:५२से), ३.अमन तांबोळी (सांगली, ०१:३१:६२से);
महिला: १.अंजली रानवडे (पुणे, ०१:५६:४६से), २.योगेश्वरी कदम(सांगली, ०२:००:१२से), ३.शिया ललवाणी(नाशिक,०२:०१:०७से);
१००किमी गट:
पुरुष:
१६ ते ३५ वयोगट: १.बिजेन कुमार(०२:४४:३९से), २.सिनक्लेर डी(०२:४७:४०से), ३.करण गाढवे(०२:४८:१८से);
३६ वर्षावरील गट: १.मायकेल लेहनिग(०२:४७:३३से), २.अनुप पवार(०२:४८:१८से),३.रमेश कुमार(०२:५५:११से);
महिला:
१६ ते ३५ वयोगट: १.आर हरिणी श्री(०३:५९:४१से), २.अरुनीमा पी(०४:०७:१०से), ३.डिंपल यादव(०४:०७:३१से);
३६ वर्षावरील गट: १.अंजली भालिंगे(०३:११:१९ से), २.नेहा टिकम(०३:१४:५५से), ३.कांचन बोकील(०३:२६:२४से);
५०किमी गट:
पुरुष:
१४ ते ३५ वयोगट: १.हर्ष पवार(०१:२४:१९से), २.मिहिर देव(०१:२४:३३से), ३.कट्टा वंशी(०१:२४:३६से);
३६ वर्षावरील गट:१.किरण पवार(०१:२५:०९से), २.राम जाधव(०१:२५:४७से),३.सतीश सावंत(०१:२५:५४से);
महिला:
१४ ते ३५ वयोगट: १.अंजली निंगवाल(०१:३६:३१से), २.श्रेया बर्वे(०१:३७:४७से), ३.किरण राजपूत(०१:४७:०६से);
३६ वर्षावरील गट: १.गौरी गुमास्ते(०१:३६:३६से), २.समृद्धी कुलकर्णी(०१:४०:०० से), ३.आरती भांडवले(०१:५०:४७से);
२५किमी गट:
पुरुष:
१४ ते ३५ वयोगट: १. तनिश सक्सेना(००:४१:४८से) २.किरण बंडगर(००:४४:१८से), ३.पियुष ओचानी(००:४४:२८से);
३६ वर्षावरील गट: १.विक्रांत आळेकर(००:४१:५१से), २.प्रवीण पाटील(००:४५:०४से), ३.अर्जुन पाटील(००:४६:१०से);
महिला:
१४ ते ३५ वयोगट: १. अनन्या उपाध्याय(००:४६:४५से), २.शांती सक्सेना(००:४७:३४से), ३.ऐश्वर्या दुधाळे(००:४९:३७से);
३६ वर्षावरील गट: १.यानपिंग यान(००:४७:३१से), २.योगिता पुंड(००:५७:३२से), ३.आस्वरी गुप्ता(०१:००:२९से);
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । रोहितसाठी भावूक चाहत्यांबाबत हार्दिकचं मोठं विधान; म्हणाला, ‘…लक्ष देत नाही’
दोनच प्रश्नात हार्दिक आणि बाउचरची बोलती बंद, पाहा मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेत काय झालं