भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानावर खेळला जात आहे. ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली होती. बुमराहला वेदना होत असल्याचे पाहून भारतीय चाहते देखील काळजीत पडले. भारतीय कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) यावेळी खूपच तणावात दिसला. आता भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) यांनी बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे.
शनिवारी (8 डिसेंबर) रोजी ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) गोलंदाजी करताना त्याच्या स्नायूंमध्ये ताण जाणवत होता, परंतु गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) म्हणाले की, ही फक्त एक क्रॅम्प आहे. वेगवान गोलंदाज बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डावातील 81वे षटक टाकताना बुमराहला थोडा अस्वस्थ वाटत होता. यानंतर संघाचा फिजिओ मैदानात आला आणि बुमराहशी बोलून त्याच्यावर तातडीने उपचार केले. मात्र, काही वेळाने बुमराह गोलंदाजी करण्यास तयार झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) पत्रकारांना म्हणाले, “जसप्रीत बुमराह तंदुरुस्त आहे. तो फक्त क्रॅम्प होता. त्यानंतर त्याने गोलंदाजी केली आणि विकेट्सही घेतल्या हे तुम्ही पाहिले असेल.”
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 180 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) झंझावाती शतकाच्या जोरावर 157 धावांची मोठी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 128 धावांत 5 विकेट्स गमावल्या होत्या. सध्या रिषभ पंत (Rishabh Pant) (28), नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) (15) नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ENG vs NZ; जो रूटने झळकावले 36 वे कसोटी शतक! ‘या’ दिग्गजाची केली बरोबरी
IND vs AUS; मोहम्मद सिराजच्या वागण्यावर संतापला दिग्गज! हेडसोबतच्या वादावर केले मोठे वक्तव्य
चेतेश्वर पुजारानं सांगितलं भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप कामगिरीमागचं कारण, म्हणाला…