टोकियो ऑलिंपिक २०२० मधील सातव्या दिवसाची (२९ जुलै) सुरुवात भारतासाठी आनंदाचा ठरताना दिसत आहे. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने, बॉक्सिंगमध्ये सतीश कुमारने, हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने आणि नेमबाजीत अतनू दासने विजय मिळवला. असे असले तरीही महिला बॉक्सिंगमधून भारतासाठी एक वाईट बातमी येत आहे. सहा वेळची जागतिक चॅम्पियन एमसी मेरी कोमला ५१ किलो वजनी गटातील उपउपांत्यपूर्व फेरीच्या राऊंड १६ मध्ये कोलंबियाच्या इंग्रीट वलेन्सीयाकडून ३-२ ने पराभूत केले. यावेळी मेरीच्या डोळ्यात अश्रू होते.
पहिला राऊंड पराभूत झाल्यानंतर मेरीने दुसऱ्या राऊंडमध्ये ३-२ असे पुनरागमन केले होते. पण ती राऊंडमध्ये जिंकू शकली नाही. (Indian Boxer MC Mary Kom loses to Ingrit Valencia 3-2)
💔 💔
London @Olympics 🥉medalist @MangteC put up a memorable fight but it wasn’t to be, fell short as she goes down 2-3 against Rio #Olympics 🥉medalist 🇨🇴's Ingrit V in Round of 16 match of @Tokyo2020 . #RingKeBaazigar#boxing#Tokyo2020#Cheer4India#TeamIndia pic.twitter.com/d5RKpusKN6
— Boxing Federation (@BFI_official) July 29, 2021
यापूर्वी तिने लंडन ऑलिंपिक्स २०१२ मध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते, तर इंग्रीटने २०१६ साली रियो गेम्समध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते.
सुपरमॉम मेरी कोम
मेरी कोम दुसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये भाग घेत आहे. ३८ वर्षीय मेरी ३ मुलांची आई आहे. मेरी टोकियोमध्ये ५१ किलो वजनी गटात भाग घेत आहे. मणिपूरची मेरी टोकियो ऑलिंपिकमध्ये उद्घाटन समारंभात भारतीय गटाची ध्वजवाहक होती.
तिने मार्च २०२० मध्ये आशिया/ओसनिया उपांत्य फेरीत पोहोचण्यासोबतच टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळण्याची पात्रताही मिळवली होती. कदाचित मेरीची ही शेवटची ऑलिंपिक असू शकते.
बॉक्सिंगमध्ये भारताला मिळू शकतात ३ मेडल
बॉक्सिंगमध्ये भारताला ३ पदकं मिळण्याची शक्यता वाढताना दिसत आहे. भारताचा तीन बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. लवलीना, पूजा राणी आणि सतीश कुमार यांनी आपला पुढचा एक सामना जिंकला, तर भारताला बॉक्सिंगमध्ये तीन पदकं मिळतील.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना