टोकियो! ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुष बॉक्सिंगमधील ९१+ किलो वजनी गटातील राऊंड १६ मधील सामना भारत आणि जमैका संघात पार पडला. या सामन्यात भारताकडून सतीश कुमार, तर जमैकाकडून रिचार्डो ब्राऊन हे आमने- सामने होते. हा सामना सतीशने ४-१ ने जिंकला आहे
𝗪𝗛𝗔𝗧 𝗔 𝗗𝗘𝗕𝗨𝗧 🔥
Our Baazigar #SatishKumar beats 🇯🇲's R Brown 4-1 in Round of 16 of +91 kg and enters the Quarter finals at @Tokyo2020 💪🏻
1 step away from securing a medal 😍#RingKeBaazigar#boxing#Tokyo2020#Cheer4India#TeamIndia pic.twitter.com/1MFnAVyZf0
— Boxing Federation (@BFI_official) July 29, 2021
या सामन्यात त्याने जमैकाचा दमदार खेळाडू रिचार्डोला चांगलेच आव्हान दिले. पहिल्या राऊंडमध्ये सतीश पुढे होता. त्याचा खेळ पाहून परीक्षकांनी त्याला १०- १० गुण दिले. त्यानंतर त्याने दुसरा राऊंडही जिंकला. (Indian Boxer Satish Kumar beats Ricardo Brown of Jamaica in men’s Super Heavy (+91kg) to qualify for quarterfinals)
यासोबतच तो उपांत्यपूर्व सामन्यात पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्याकडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत. त्याचा पुढील सामना रविवारी (१ ऑगस्ट) उझबेकिस्तानच्या जागतिक चॅम्पियन बखोदिर जलोलोव्हविरुद्ध होणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-नौकानयनात भारतीय जोडीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन; पटकावला ‘हा’ क्रमांक
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना