पाकिस्तान संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. येथे पाकिस्तान संघातील 5 खेळाडूंनी भारतीय टॅक्सी ड्रायव्हरने भाडे घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्याबरोबर जेवणासाठी नेले. ही घटना मागील आठवड्यात ब्रिस्बेनमध्ये घडली.
ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग काॅर्पोरेशन (एबीसी) रेडिओचे प्रस्तुतकर्ता एलिसन मिशेल (Alison Mitchell) यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनला (Mitchell Johnson) या घटनेची माहिती दिली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एलिसन सामनाच्या दिवशी त्याच टॅक्सी ड्रायव्हरसह स्टेडियमवर जात होत्या. ज्या ड्रायव्हरला पाकिस्तानच्या संघाने जेवणासाठी सोबत नेले होते. प्रवासादरम्यान त्याने या घटनेचा उल्लेख केला.
ड्रायव्हरने रेडिओ सादरकर्त्या एलिसनला सांगितले की तो काही दिवसांपूर्वी भारतीय पाकिस्तानच्या 5 खेळाडूंना घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचला होता. तेव्हा तिथे पाकिस्तानच्या संघातील यासीर शाह (Yasir Shah), शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि नसीम शहा (Naseem Shah) हे खेळाडू उपस्थित होते.
या खेळाडूंनी ड्रायव्हरला भारतीय हाॅटेलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. हाॅटेलवर पोहोचल्यानंतर खेळाडूंनी त्याला प्रवासभाडे दिले, तेव्हा त्याने मी आपला आदर करतो, असे सांगत पैसे घेण्यास नकार दिला.
यानंतर, यासिर शाह त्याला म्हणाला, “जर आपण प्रवासभाडे घेऊ शकत नाही तर आमच्याबरोबर जेवायला चला. त्यामुळे भारतीय ड्रायव्हरने जेवायला जाण्याची ऑफर स्वीकारली आणि त्यावेळी त्याने डिनर टेबलवर खेळाडूंसोबत सेल्फी घेतला.
ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (एबीसी) देखील व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एलिसन मिशेल जॉन्सनला घटनेविषयी सांगत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना एबीसीने लिहिले की, “भारतीय टॅक्सी चालक आणि पाच पाकिस्तानी खेळाडूंची मनमोहक कहाणी.”
https://twitter.com/abcgrandstand/status/1198442285509357570
तसेच याबद्दलचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये यासिर शाहने या घटनेबद्दल माहिती सांगितली आहे. यावेळी त्याने हे देखील सांगितले की तो ड्रायव्हरने त्यांच्याशी क्रिकेटबद्दल गप्पाही मारल्या.
https://twitter.com/TheRealPCB/status/1199264691631116296
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन कसोटी सामना एक डाव आणि 5 धावांनी जिंकली. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 29 नोव्हेंबरपासून ऍडलेडमध्ये खेळला जाणार आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र असणार आहे.




