भारताचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक शानदार रेकाॅर्ड केले. त्यातील काही रेकाॅर्ड्स कोणत्याही फलंदाजासाठी मोडीत काढणे शक्य नाहीत. जर त्याची कसोटी कारकिर्द पाहिली, तर ते तिहेरी शतक असो किंवा षटकारांचा बादशहा. मात्र अलीकडेच इंग्लंडच्या जो रूटने (Joe Root) सेहवागचा द्विशतक रेकाॅर्ड मोडीत काढला. आता सेहवागचा एक नवा रेकाॅर्ड धोक्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील षटकारांच्या रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव आघाडीवर आहे. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. रोहित कसोटीत सेहवागचा षटकारांचा रेकाॅर्ड मोडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनू शकतो. (16 ऑक्टोबर) पासून भारत-न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 61 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 87 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर सेहवागने त्याच्या कारकिर्दीत 104 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 91 षटकार मारले. रोहित सेहवागच्या षटकारांच्या रेकाॅर्डपासून 5 षटकार दूर आहे. 5 षटकार ठोकताच रोहित सेहवागला मागे टाकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
PAKW vs NZW; पाकिस्तानच्या पराभवामुळे भारत टी20 विश्वचषकातून बाहेर
बेजबाॅलला फ्लाॅप ठरवणार गौतम गंभीरचा ‘हा’ प्लॅन! न्यूझीलंड मालिकेपूर्वीच केले मोठे वक्तव्य
PAK vs ENG; दुसऱ्या कसोटीत बाबरच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू