---Advertisement---

“आजकाल निवृत्ती हा एक…” भारतीय कर्णधाराचे मोठे वक्तव्य

On: बुधवार, सप्टेंबर 18, 2024 7:09 PM
Rohit sharma pc
---Advertisement---

भारतीय संघ उद्यापासून (19 सप्टेंबर) घरच्या मैदानावर बांगलागदेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला जाणार आहे, तर दुसरा सामना कानपूर येथे रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, आतापासून निवृत्ती म्हणजे चेष्टा चालली आहे.

रोहितने नुकतेच जिओ सिनेमाशी बोलताना निवृत्तीबद्दल सांगितले. तो म्हणाला, “आजकाल जागतिक क्रिकेटमध्ये निवृत्ती हा एक विनोद बनला आहे, लोक निवृत्तीची घोषणा करतात पण नंतर खेळायला येतात. भारतात असे अजून झाले नाही. मी इतर देशांचे खेळाडू पाहत आहे. त्यांनी निवृत्तीची घोषणा केली पण नंतर यू-टर्न घेतला. त्यामुळे तुम्हाला कधीच कळत नाही की कोणी खरोखरच संन्यास घेतला आहे की नाही. माझा निर्णय अंतिम आहे आणि अगदी स्पष्ट आहे. मी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याची ही योग्य वेळ होती.”

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

महत्त्वाच्या बातम्या-

बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माचा रेकॉर्ड लाजिरवाणा, नेहमीच फ्लॉप झालाय हिटमॅन!
श्रीलंकेच्या फलंदाजाचा धमाका, कसोटी क्रिकेटमधील एका खास विश्वविक्रमाची बरोबरी
आयपीएल 2025 साठी रिटेन्शन नियमांमध्ये बदल व्हायला हवेत? दोन दिग्गजांचं मोठं वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---