सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) मालिका खेळली जात आहे. त्यातील 3 सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 1-1 सामन्यात विजय मिळवला, तर 1 सामना ड्राॅ झाला. आता चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला जाणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार ‘रोहित शर्मा’ने (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), शुबमन गिल (Shubman Gill) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) या युवा खेळाडूंच्या फलंदाजीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
‘यशस्वी जयस्वाल’ने (Yashasvi Jaiswal) पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 161 धावांची मॅचविनिंग खेळी खेळली होती पण त्यानंतर त्याची बॅट शांत राहिली, तर गिल आणि पंत यांना आतापर्यंत खेळलेल्या 3 कसोटी सामन्यात चांगल्या सुरूवातीचा फायदा उठवता आला नाही. या तिन्ही फलंदाजांच्या फॉर्मबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहितने पत्रकारांना सांगितले की, “गिल, जयस्वाल आणि पंत हे खेळाडू एकाच बोटीत आहेत. ते काय सक्षम आहेत हे त्यांना माहीत आहे. आपण गोष्टी क्लिष्ट करू नये.”
रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “जयस्वाल पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळत आहे. तो काय सक्षम आहे हे त्याने आधीच दाखवून दिले आहे. तो खूप हुशार खेळाडू आहे आणि जेव्हा तुमच्याकडे त्याच्यासारखा खेळाडू असेल तेव्हा तुम्हाला त्याच्या मानसिकतेत जास्त गोंधळ घालायचा नाही. त्याला शक्य तितके मोकळेपणाने खेळू द्या आणि त्याच्या फलंदाजीचा जास्त विचार करून त्याच्यावर अतिरिक्त भार टाकू नका. त्याला त्याच्या फलंदाजीची इतर कोणापेक्षा चांगली समज आहे आणि त्याने आतापर्यंत त्याचे क्रिकेट खेळले आहे.”
गिलबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “जिथपर्यंत गिलचा संबंध आहे, तो किती कुशल खेळाडू आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हे सर्व त्याच्या कौशल्यांवर विश्वास ठेवण्याबद्दल आहे. जयस्वाल याच्याप्रमाणेच आम्हालाही त्याच्यासाठी गोष्टी गुंतागुंतीच्या करायच्या नाहीत. त्याला त्याची फलंदाजी चांगलीच कळते आणि मोठी धावसंख्या कशी करायची हे त्याने याआधीही केले आहे. त्याला फक्त त्याच्या चांगल्या सुरूवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करायचे आहे.”
पंतबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “पंतवर कोणत्याही प्रकारचे दडपण नाही. त्याने आतापर्यंत येथे 3 कसोटी सामने खेळले आहेत. तो भारतात चांगल्या फॉर्ममध्ये होता. आम्ही 2 किंवा 3 कसोटी सामन्यांच्या आधारे मूल्यांकन करू नये. त्याला माहित आहे की त्याला काय करायचे आहे.”
💬💬 Jasprit Bumrah’s confidence in his skillset, clarity of thought, and simple approach make it very easy for me.#TeamIndia captain Rohit Sharma shares his thoughts on captaining Jasprit Bumrah and his impact in the series so far. 👌#AUSvIND | @ImRo45 | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/WiXulJhqlj
— BCCI (@BCCI) December 24, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फिट झाला हा मॅचविनर गोलंदाज
याला म्हणतात कमिटमेंट! या भारतीय खेळाडूने दुखापत होऊनही सराव थांबवण्यास नकार दिला
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाचंच वर्चस्व, 14 वर्षांत केवळ इतके पराभव