भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी ( 22 मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 21 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिका 2-1 अशी जिंकली. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित सर्व पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याने भारतीय संघाच्या पराभवाचे कारण सांगितले.
चेन्नई वनडेतील पराभवानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित म्हणाला,
“संघातील प्रमुख खेळाडूंच्या दुखापती ही समस्या आहे. भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असते. त्यामुळे खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही. याच कारणाने दुखापती होतात. मी याबाबतीतील तज्ञ नाही. मात्र, विश्वचषकासाठी आमचे सर्वोत्तम पंधरा खेळाडू उपलब्ध असतील अशी मला आशा आहे.”
भारतीय संघाचे संघ व्यवस्थापन खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट करत, खेळाडूंना विश्रांती देत असल्याचे देखील रोहितने सांगितले. सध्या भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह व श्रेयस अय्यर हे गंभीर दुखापतीमुळे संघाचा भाग नाहीत.
उभय संघांतील या मालिकेचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 5 विकेट्सच्या अंतराने सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 10 विकेट्स राखून विजय मिळवलेला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियाने 21 धावांच्या फरकाने नावावर केला. तिसऱ्या सामन्याचा नायक फिरकीपटू ऍडम झंपा ठरला. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 4 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला विजायासठी 270 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे संघाला गाठता आले नाही. भारतासाठी एकट्या विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली.
तत्पूर्वी, गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल मार्श याने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. मार्शने या मालिकेत केलेल्या अप्रतिम कामगिरीसाठी त्याला मालिकावर म्हणून निवडण्यात आले.
(Indian Captain Rohit Sharma Said Our Schedule So Busy Players Don’t Have Much Rest)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडते फक्त ऑस्ट्रेलियाच! भारतात येऊन पाच वर्षात तीनदा दिलाय धोबीपछाड
“आयपीएल सुरू झाल्यावर असे पराभव विसरले जातील”, दिग्गजाने कर्णधार व प्रशिक्षकांना सुनावले