भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सर्वात फिट क्रिकेटपटू मानला जातो. तो आपली फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी डाएटवर देखील भरपूर जोर देतो. त्याने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या डायट प्लॅनबद्दल खुलासा केला होता. ज्यामध्ये त्याने, अंड्याचा समावेश आहे, असेही म्हटले होते. यामुळे ट्विटरवर त्याला चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
अनेक चाहत्यांनी विराट कोहलीला ‘अंडी खाणारा शाकाहारी’ असे ही म्हणायला सुरुवात केली आहे. तसेच विराट बराच ट्रोल होत आहे. यामागे कारण असे की काही दिवसांपूर्वी विराटने ‘वेगन’ जीवनपद्धती (शुद्ध शाकाहारी) स्विकारल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक चाहत्यांना प्रश्न पडला होता की जर विराटने शाकाहारी होण्याची ठरवले होते, तर तो अंडी कशी काय खातो. त्यामुळे त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या.
या प्रतिक्रिया पाहून अखेर विराट कोहलीनेच आपले मौन सोडले आणि देखील ट्विट करत आपली प्रतिउत्तर दिले. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मी असे कधीच म्हटले नाही की, मी वेगन आहे. मी नेहमी शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करतो. दीर्घ श्वास घ्या आणि भाज्या खा (जर तुम्हाला हवं असेल तर)”
I never claimed to be vegan. Always maintained I'm vegetarian. Take a deep breath and eat your Veggies (if you want 😉)💪😂✌️
— Virat Kohli (@imVkohli) June 1, 2021
वेगन डाएटबद्दल बोलायचं झालं तर, या डाएटमध्ये त्याच पदार्थांचा समावेश असतो, जे पदार्थ पूर्णपणे नैसर्गिक असतात आणि उत्पादने जे प्राण्यांशी संबंधित नसतात. विराट कोहलीने २०१९ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, तो पूर्णपणे शाकाहारी झाला आहे.
विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक प्रश्न उत्तरांचे सेशन आयोजित केले होते. यामध्ये अनेक चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले होते. तसेच एका चाहत्याने त्याला विचारले होते की,” तुमचा डाएट प्लॅन काय आहे? याचे उत्तर देत त्याने लिहिले होते की,” खूप साऱ्या भाज्या,काही अंडी, २ कप कॉफी, डाळ,क्विनोआ,खूप पालक, डोसा,परंतु सर्व काही मर्यादित प्रमाणात.” हीच प्रतिक्रीया पाहून, चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“इंग्लंड संघाला कुठल्याही परिस्थितीत आपला रवींद्र जडेजा शोधण्याची गरज आहे”
कोरोनाविरुद्धच्या लढाईत युवराज सिंगचाही हातभार; राबवणार ‘हा’ मोठा उपक्रम
कमीतकमी २ षटकार मारत सर्वाधिक आयपीएल डाव खेळणारे फलंदाज, यादीत भारतीयांचा बोलबाला