विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तो कोरोना व्हायरसमुळे आपल्या कुटुंबातील सदस्य गमावलेल्या लोकांना मदत मदत करणार आहे.
‘टीम फॉर ह्यूमॅनिटी’ला जोडला गेला विराट
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे सोशल मीडियावर कोट्यावधी फॉलोवर्स आहेत.
त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “अडीच लाखांहून अधिक कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. आज मी ‘टीम फॉर ह्यूमॅनिटी’ला जोडलो गेलो आहे. ज्यांनी कोरोनामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे आणि ज्यांना या कठीण काळात आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबांसाठी या उपक्रमाद्वारे पैसे जमा करण्याचे काम केले जाणार आहे. या उपक्रमात जगभरातील खेळाडू एकत्र येऊन मदत करणार आहेत. तुम्ही देखील मदत करू शकता आणि अशा समूहाचा एक भाग बनू शकता, जे खरच चांगले कार्य करत आहे.”(Indian captain Virat Kohli join team for humanity for raising funds for corona affected family)
https://www.instagram.com/p/CQ5dMOlNq28/?utm_source=ig_web_copy_link
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी यापूर्वीही केली होती मदत
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी एक मोहीम सुरू केली होती. ज्यामध्ये त्यांनी २ कोटींचे योगदान दिले होते. यासोबतच ७ दिवसांत ७ कोटी निधी गोळा करण्याचे आव्हान ठेवले होते. त्यांनी जनतेला या मोहिमेत निधी दान करण्यासाठी आवाहन केले होते. त्यांची ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली होती. त्यांना अवघ्या सात दिवसात ११ कोटी गोळा करण्यात यश आले होते. हे अभियान यशस्वीरित्या पार पडल्यानंतर त्यांनी जनतेचे आभार देखील मानले होते.
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयसाठी यंदाची दिवाळी असेल बंपर दिवाळी! होणार आयपीएलच्या २ नवीन संघांची घोषणा
टी२० विश्वचषकावेळी भारत अडचणीत असताना ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो कर्णधार कोहलीची जागा