---Advertisement---

इंग्लिश फलंदाजांनी चोप चोपलं, तरीही का दिली नाही हार्दिकच्या हाती बॉलिंग? कॅप्टन विराट म्हणतो…

On: शनिवार, मार्च 27, 2021 11:49 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चालू असलेली तीन सामन्यांची वनडे मालिका अतिशय रोमांचक घडीवर आली आहे. इंग्लंडने शुक्रवारी (२६ मार्च) पुण्यात झालेला दुसरा वनडे सामना ६ विकेट्स राखून जिंकला. यासह त्यांनी मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडपुढे ३३७ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिसे काढली आणि ४३.३ षटकात भारताचे आव्हान पूर्ण केले.

असे असतानाही भारताचा कर्णधार विराट कोहली याने अष्टपैलू हार्दिक पंड्या याला गोलंदाजीची संधी दिली नाही. आता विराटने आपल्या या निर्णयामागील कारणाचा खुलासा केला आहे.

भारतीय गोलंदाजांनी खर्च केल्या खूप धावा
इंग्लंडच्या डावात भारतीय गोलंदाजांनी मिळून अवघ्या ३ विकेट्स घेतल्या. त्यातही कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या अतिशय महागडे गोलंदाज ठरले. कुलदीपने १० षटके गोलंदाजी करताना ८४ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. दुसरीकडे कृणालही ६ षटकात ७२ धावा देत रिकामा हात माघारी परतला. शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा या गोलंदाजांनाही खास कामगिरी करता आली नाही.

हार्दिकने यापुर्वी इंग्लंडविरुद्ध टी२० मालिकेत चांगली गोलंदाजी केली होती. अशात सहावा गोलंदाज म्हणून संघात उपलब्ध असलेल्या हार्दिकला वनडेतही गोलंदाजीस पाठवले जाईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र त्याला एकही षटक टाकण्याची संधी देण्यात आली नाही. भारतीय संघाच्या पुढील व्यस्त वेळापत्रकाला पाहता अष्टपैलू हार्दिकला तंदुरुस्त ठेवणे गरजेचे असल्याने कोहली हा निर्णय घेतला होता.

विराट कोहलीने सांगितले खरे कारण
कोहली म्हणाला की, “आम्ही हार्दिकचा योग्यप्रकारे वापर करणे गरजेचे आहे. कोणत्या वेळी त्याच्यातील कोणत्या कौशल्याचा वापर करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार टी२० मालिकेत आम्ही त्याच्या गोलंदाजीचा वापर करुन घेतला. परंतु वनडेत त्याच्यातील जबाबदाऱ्या कमी करणे निकडीचे आहे. आम्हाला पुढे इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे हार्दिकची तंदुरुस्ती टिकवून ठेवावी लागणार आहे. ”

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी ब्रेकिंग: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर कोविड पॉझिटिव्ह, ट्विट करत दिली माहिती

दुसऱ्या वनडेत शतक झळकावल्यानंतर का पकडले कान? केएल राहुलने केला खुलासा

बेन स्टोक्स ९९ धावांवर बाद, आकाशाकडे पाहात दिवंगत बापाची मागितली माफी; पाहा तो भावनिक क्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---