---Advertisement---

दुसऱ्या वनडेत शतक झळकावल्यानंतर का पकडले कान? केएल राहुलने केला खुलासा

On: शनिवार, मार्च 27, 2021 9:10 AM
---Advertisement---

शुक्रवार रोजी (२६ मार्च) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा वनडे सामना झाला. इंग्लंडले ६ गडी राखून हा सामना खिशात घातला आणि मालिकेतही १-१ ने बरोबरी साधली. असे असले तरी, या सामन्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याची जोरदार चर्चा रंगली.

या सामन्यात झुंजार शतक झळकावल्यानंतर अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन करत सर्वांचे लक्ष वेधले. आता त्याने स्वत: आपल्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागील कारण सांगितले आहे.

नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी गोलंदाजी निवडत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर सुरुवातीला फलंदाजी करताना डावातील ३२ व्या षटकापर्यंत भारत ३ बाद १५८ धावा अशा स्थितीत होता. रोहित शर्मा, शिखऱ धवन, विराट कोहली यांसारखे फलंदाज बाद झाल्याने संघाची गाडी डगमगताना दिसत होती.

मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलने धावांची शंभरी पार करत संघाला भक्कम आघाडी मिळवून देण्यात योगदान दिले. ११४ चेंडूंत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १०८ धावा त्याने केल्या. अखेर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा गोलंदाज टॉम करनने त्याला पव्हेलियनला धाडले.

यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने राहुलचे शतक साजरे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यावेळी हवेत बॅट उंचावत राहुल आपल्या शतकाचे सेलिब्रेशन करताना दिसला. दरम्यान त्याने आपल्या हातातील बॅट आणि हेल्मेट खाली ठेवत कान पकडले.

https://www.instagram.com/p/CM4UJZZA3kq/?utm_source=ig_web_button_share_sheet

भारताचा डाव संपल्यानंतर याबद्दल राहुला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “हे सेलिब्रेशन गोंधळ शांत करण्यासाठी होते. याचा अर्थ असा होत नाही की कुणाचा अपमान करू इच्छित होतो. कोही लोक असतात ते खराब कामगिरीनंतर तुमची अवहेलना करतात. परंतु त्यांच्यावर दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय असतो. म्हणूनच या मी कानावर हात ठेवत सर्वांना शांत राहण्याचा संदेश दिला आहे.”

मागील काही सामन्यांतील फ्लॉप शोमुळे राहुल टीकाकारांच्या निशाण्यावर होता. अशात या सामन्यात झुंजार शतक झळकावत त्याने टिकाकारांची बोलती बंद केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बेन स्टोक्स ९९ धावांवर बाद, आकाशाकडे पाहात दिवंगत बापाची मागितली माफी; पाहा तो भावनिक क्षण

‘या’ युवा खेळाडूंनी शानदार प्रदर्शनाने जिंकले भारतीय दिग्गजाचे मन, दिली टी२० विश्वचषक संघात जागा

नाद करायचा नाही! वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा २० पेक्षा अधिक षटकार ठोकणारे संघ, भारताचा तर उल्लेखही नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---