---Advertisement---

मारक्रमची विजयी धाव आणि कर्णधार राहुलवर बसला लाजीरवाण्या पराक्रमाचा शिक्का; आयुष्यभर नाही विसरणार

KL Rahul
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शुक्रवार (२१ जानेवारी) रोजी तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना झाला. या सामन्यात भारताने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे सामन्यासह भारताला मालिकाही गमवावी लागली. मात्र, या सामन्यात सर्वाधिकृ नाचक्की झाली ती कर्णधार केएल राहुल याची.

केएल राहुलने (KL Rahul) कर्णधार म्हणून नेतृत्व केलेली ही पहिलीच एकदिवसीय मालिका होती. त्यामुळे सामन्यात द. आफिक्रेने विजय मिळवताच आयुष्यात कर्णधार म्हणून नेतृत्व केलेली पहिली एकदिवसीय मालिकाही त्याने गमावली. मात्र, या पराभवासह त्याच्या नावावर आणखीन एक लाजीरवाणा विक्रम जमा झाला आणि तो म्हणजे, ‘भारताकडून कर्णधारपदी खेळायला आल्यानंतर सुरुवातीचे सर्वाधिक सामने गमावणे.’ (Indian Captains to lose their first 3 matches)

विराटचा राजीनामा आणि रोहितची अनुपस्थिती यानंतर अनुभवी राहुलकडे संघाचे नेतृत्व आले. मात्र, अगोदर तितकासा नेतृत्वाचा आणि विजयी नेतृत्वाचा अनुभव नसल्याने केएल राहुलच्या नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिकेतील दुसरी कसोटी आणि पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात सपाटून मार खात पराभव स्विकारला. यासह केएल राहुल कर्णधार म्हणून पहिल्या तीनही सामन्यात पराभव पाहणारा भारताचा तिसरा संघनायक ठरला आहे. यापूर्वी दत्ताजीराव गायकवाड, मन्सूर अली खान पतौडी यांनी असे पराभव पाहिलेत. आणि त्यानंतर आता केएल राहुल या यादीत आहे.

पहिले तीन पराभव पचवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तिसरा असण्यासोबत राहुल कॅप्टन म्हणून पहिले दोन सलग एकदिवसीय सामने गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीतही सामील झालाय. आजवर भारताच्या पाच कर्णधारांनी त्यांचे पहिले दोन वनडे सामने गमावले होते. या यादीत आता राहुल तिसरा आहे.

अधिक वाचा –

अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले | Sachin | Dravid |  Kallis |

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---