---Advertisement---

टीम इंडियाबरोबर शास्त्री ‘डॉगी विंस्टन’चेही बनले गुरू, प्रशिक्षण देतानाचा व्हिडिओ तूफान व्हायरल

On: बुधवार, जून 16, 2021 11:48 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) आयोजित पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनपासून साऊथम्प्टनवर खेळला जाईल. या सामन्याक भारतीय संघ कसोटी जेतेपद जिंकण्याकरिता न्युझीलंड विरुद्ध दोन हात करेल. या अंतिम सामन्यासाठी नुकताच 15 सदस्यीय भारतीय संघदेखील जाहीर झाला आहे. या ऐतिहासिक सामन्याकरीता विराटसेना कसून मेहनत घेताना दिसत आहे. अशात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मैदानावर खेळाडूंचा सराव करुन घेण्याव्यतिरिक्त वेगळी गोष्ट करताना दिसले.

रवी शास्त्री यांनी दिले ‘विंस्टन’ला प्रशिक्षण-
भारतीय संघ प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी द रोज बाऊलच्या मैदानावर भारतीय संघाच्या सराव संपल्यानंतर पिच क्यूरेटर (खेळपट्टीची देखरेख करणारे व्यक्ती) सायमन ली यांचा कुत्रा विंस्टनला क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षण दिले. शास्त्रींनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ टाकला असून त्याखाली लिहिले की, ‘आमच्या विंस्टनने भारतीय संघाच्या सरावानंतर टेनिस चेंडूने सराव केला.’ या व्हिडिओत भारतीय कर्णधार विराट कोहली किटबॅग घेऊन मैदानाबाहेर जाताना दिसतोय.

विंस्टनने केले क्षेत्ररक्षण-
व्हिडिओमध्ये शास्त्री हातात टेनिस रॅकेट पकडून उभे दिसत असून ते चेंडूला वेगवेगळ्या दिशेला फेकत आहे. यावर चेंडूला फेकलेला चेंडू पळत जाऊन पकडत आहे. भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे श्वानप्रेम या व्हिडिओद्वारे जगजाहीर झाले आहे. ते नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आपले श्वानप्रेम दर्शवत असतात. शास्त्रींचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारतीय संघाची तयारी पूर्ण-
विश्वकसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी विराटसेनेने जोरदार सराव केला आहे. भारतीय फलंदाजांनी यावेळी तंत्रशुद्ध पद्धतीने चेंडू खेळण्यासोबतच आक्रमक आणि मोठे फटके लगावण्याचा देखील सराव केला. त्यामुळे न्युझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याची तयारी पूर्ण झालेली दिसत आहे. अंतिम सामना 18 जून पासून सुरू होईल आणि 22 जून रोजी संपेल.

महत्त्वाच्या बातम्या-

WTC Final: कसोटीत ५ शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजाला नारळ, चाहत्यांकडून टिकेचा भडिमार

पुजाराच्या टिकाकारांना सचिनने सुनावली खरीखोटी; म्हणाला, ‘त्याच्यामुळेच भारत कसोटीत यशस्वी’

दुर्दैवच! २ द्विशतके झळकावणाऱ्या एकमेव फलंदाजावर अन्याय, भारताच्या अंतिम ताफ्यातून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---