---Advertisement---

भुवनेश्वरच्या घरी आली ‘नन्ही परी’! पत्नी नूपुरने दिला मुलीला जन्म

On: बुधवार, नोव्हेंबर 24, 2021 6:18 PM
---Advertisement---

 

भारतीय क्रिकेट संघाच वेगवान स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार आता वडील बनला आहे. भुवनेश्वरची पत्नी नूपुर नागरने बुधवारी (२४ नोव्हेंबर) मुलीला जन्म दिला. नूपुर बुधवारी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात आई झाली.

भारतीय क्रिकेट संघातील यावर्षी वडील बनणाऱ्यांमध्ये भुवनेश्वर तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव हे दोन्ही भारतीय खेळाडू याचवर्षी वडील बनले आहेत.  भुवनेश्वरने या आनंदाच्या बातमीची कसलीही माहिती अद्याप चाहत्यांना दिलेली नाही. मात्र, मेरठ जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष राकेश गोयल यांनी याबाबत माहिती दिली.

मेरठ जिल्हा क्रिकेट एसोसिएशनचो कोषाध्यक्ष राकेश गोयल यांनी भुवनेश्वर वडील झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, भुवनेश्वर कुमारच्या पत्नीने मुलीला जन्म दिला आहे. सध्या दोघीही पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नूपुरला मंगळवारी (२३ नोव्हेंबर) दिल्लीतील एका रुग्णालयात भरती केले गेले होते आणि बुधवारी तिने बाळाला जन्म दिला आहे. आता भुवनेश्वर कुमार गुरूवारपर्यंत त्याच्या मेरठ येथील निवसस्थानी पोहोचेल, अशी शक्यता आहे.

भुवनेश्वर आणि नूपुर यांच्या लग्नाला मंगळवारी चार वर्ष पूर्ण झाला आहे आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना मुलगी झाली आहे. या आनंदाच्या बातमीमुळे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद अधिक वाढला.. भुवनेश्वर आणि नूपुर दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि त्यांच्या या मैत्रीचे रुपांतर लग्नात झाले होते.

भुवनेश्वर कुमारने नुकत्याच खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्याच्या टी२० मालिकेत चांगले प्रदर्शन केले आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून तो खराब फार्मशी झगडत होता. मात्र, त्याने या मालिकेत चांगल्या प्रकारे पुनरागमन केले आहे. त्याने या मालिकेतील तिन्ही सामने खेळले आणि तीन विकेट्स घेत संघासाठी किफायतशीर गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

तत्पूर्वी, याच वर्षी त्याला पितृशोक झाला होता. त्याचे वडील किरण पाल सिंग यांचे यावर्षी २० मे रोजी दुःखद निधन झाले होते. त्याच्या वडिलांना मागच्या बऱ्याच काळापासून लीवर संबंधी आजार होता आणि याच कारणास्तव त्यांचे निधन झाले होते. भुवनेश्वरने अद्यात त्याला मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली नसली, तरी चाहत्यांना अपेक्षा आहे की, तो लवकरच त्याच्या मुलीच्या फोटो नावासह ही आनंदाची बातमी सर्वांना कळवेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---