---Advertisement---

भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामाचा या दिवशी फुटणार नारळ; मानाच्या स्पर्धेचे कमबॅक

On: सोमवार, ऑगस्ट 8, 2022 10:48 PM
hp-vht
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२२-२३ साठीच्या देशांतर्गत हंगामातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ चा भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत होईल. या काळात १५०० हून अधिक सामने खेळवले जातील. यावेळी दुलीप ट्रॉफीसोबतच इराणी चषकाचेही पुनरागमन झाले आहे. दुलीप ट्रॉफीचे सामने ८ ते २५ सप्टेंबर दरम्यान सहा विभागामध्ये खेळवले जातील. यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी होतील. मर्यादित षटकांच्या या दोन्ही स्पर्धेत एकूण ३८ संघ सहभागी होतील.

 

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “यावेळी देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात प्रतिष्ठित दुलीप ट्रॉफीने होईल. तसेच इराणी चषकही यावर्षी पुन्हा एकदा खेळला जाईल. दुलीप ट्रॉफी ८ ते २५ सप्टेंबर या काळात सहा विभागांमध्ये बाद पद्धतीने खेळली जाईल. हे विभाग अनुक्रमे उत्तर, दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व आणि ईशान्य असे असतील. ईशान्य भारतातील पाच संघ झाल्याने यावेळी ईशान्य भारताचाही संघ दुलीप ट्रॉफीत खेळेल.

या प्रथमश्रेणी स्पर्धांनंतर सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर आणि विजय हजारे वनडे स्पर्धा १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत होतील. या दोन्ही मर्यादित षटकांच्या स्पर्धेत प्रत्येकी आठ संघांचे तीन गट आणि सात संघांचे दोन गट असतील. रणजी करंडक स्पर्धाही पुन्हा जुन्याच पद्धतीने होणार आहे. १३ डिसेंबर ते २० फेब्रुवारी दरम्यान भारतीय क्रिकेटमधील ही सर्वात मानाची स्पर्धा खेळवला जाईल. रणजी ट्रॉफी ही एलिट आणि प्लेट श्रेणीच्या आधारावर आयोजित केले जाईल. एलिट गटात ३२ संघ असतील आणि आठ संघांच्या चार गटात विभागले जातील. हंगामाच्या अखेरीस महिला चॅलेंजर्स ट्रॉफी खेळली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

दीराने रौप्य तर वहिनीने जिंकले थेट ‘सुवर्ण’पदक! कॉमनवेल्थमध्ये स्टार्क घराण्याचा दबदबा

INDvsZIM। ‘भारताच्या पुढील दौऱ्याचे वेळापत्रक आणि बरंच काही…’, फक्त एका क्लिकवर

Breaking: फायनलमध्ये पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’! भारताच्या पदरात १९वे सुवर्ण पदक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---