अनिल कुंबळे यांनी प्रक्षिशक पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाचा नवा प्रक्षिशक कोण होणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता पण आता लवकरच म्हणजे येत्या १० जुलैला भारताच्या नविन प्रक्षिशकाची निवड होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
येत्या १० जुलैला भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची निवड होईल असे ‘सौरव गांगुली’ याने सांगितले आहे. “१० जुलैला नविन प्रक्षिशकाची निवड होणार असून मुलाखत मुंबईमध्ये घेतली जाईल” असे गांगुलीने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये रिपोर्ट्सशी बोलताना सांगितले.
९ जुलै ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे तर यावेळी प्रक्षिशक निवड करण्याची जबाबदारी ‘सचिन तेंडुलकर’, सौरव गांगुली आणि ‘वी. वी. एस लक्ष्मण’ यांच्यावर सोपविण्यात आली आहे.