आयपीएल 2025 स्पर्धेतील 26 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघामध्ये आज (12एप्रिल) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना एकाना स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. गुजरातने या हंगामात आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. संघ पॉइंट्स टेबल वरती टॉपच्या स्थानी आहे, तसेच लखनऊने पाच सामन्यामध्ये तीन सामने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते.
जर दोन्ही संघांच्या हेट टू हेड रेकॉर्ड्स बद्दल बोलायचे झाल्यास, गुजरात संघाचं पारडं जड आहे. गुजरातने 4 सामने जिंकले आहेत. तसेच लखनऊने त्यांच्याविरुद्ध एक सामना जिंकला आहे. लखनऊ संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापती आहे, त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. आवेश खान संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. आवेशने दोन वेळा शुबमन गिलला बाद केले आहे. आवेश खानने सातत्याने चांगलं प्रदर्शन केलं आहे.
हा सामना लखनऊ मध्ये खेळला जाणार आहे. सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, यामुळे वातावरण थोडसं गरम राहू शकतं. ग्राउंड स्टाफने 9 मधील 2 खेळपट्टी चांगल्या प्रकारे तयार केल्या आहेत. एक खेळपट्टी काळया मातीने बनलेली आहे, तसेच दुसरी खेळपट्टी मिश्रित आहे. गुजरातच्या सामन्यासाठी कोणती खेळपट्टी निवडली आहे याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण येथे 180 धावसंख्या बनू शकते.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
लखनऊ सुपर जायंट्स : मिशेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आयुष बडोनी, डेविड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकुर, आकाश दीप, आवेश खान, दिग्वेश राठी, रवि बिश्नोई
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जॉस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अरशद खान, राशिद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलवंत खेजरोलिया/वाशिंगटन सुंदर






