प्रमुख भारतीय क्रिकेट संघ सध्या भारतात विश्वचषक खेळत आहे. त्याचवेळी चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताचा युवा क्रिकेट संघ खेळताना दिसतोय. ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वातील या संघाने धडक मारली असून, संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जातेय. अशात उपांत्य फेरीचा सामने आधी भारतीय संघाने सराव करताना स्पर्धेसाठीच्या स्वयंसेवकांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
#TeamIndia play a quick game of cricket with the local volunteers in China ahead of the #AsianGames semifinal 😃👌#IndiaAtAG22 pic.twitter.com/4LhzvGV1Zq
— BCCI (@BCCI) October 5, 2023
बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू स्वयंसेवक असलेल्या लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. अर्शदीप सिंग, शिवम दुबे, रिंकू सिंग व राहुल त्रिपाठी या व्हिडिओमध्ये खेळताना दिसून येत आहेत.
वरिष्ठ संघ विश्वचषकात व्यस्त असताना ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाला ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. भारतीय संघाने स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला. नेपाळ विरुद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 23 धावांनी विजय साजरा केला. या सामन्यात भारतासाठी यशस्वी जयस्वाल याने शानदार शतक झळकावले होते. त्यामुळे भारतीय संघ 203 धावांचे आव्हान देण्यात यशस्वी ठरलेला. त्यानंतर रवी बिश्नोई व इतर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना 6 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. या सामन्यात भारत आणि बांगलादेश आमने-सामने येणार आहेत. त्यानंतर अंतिम फेरीचा सामना सात ऑक्टोबर रोजी होईल. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान व बांगलादेश एकमेकांविरुद्ध खेळतील.
(Indian Cricket Team Playing In Asian Games Have Fun With Kids)
हेही वाचा-
भारताच्या रणरागिणींची कमाल! तिरंदाजीत मिळवलं Gold, देशाच्या नावावर Asian Gamesमध्ये 82वे पदक
विश्वचषकापूर्वी रोहितचे विधान चर्चेत; म्हणाला, ‘मला आणि खेळाडूंना माहितीये…’