जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) 2023-2025 आवृत्तीचे अंतिम फेरीचे दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. एकीकडे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने आधीच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता. आता सर्वांच्या नजरा पुढील कसोटी चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकाकडे लागल्या आहेत. 2025 चा अंतिम सामना 11 जूनपासून इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. बरं, पुढची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप कोणत्या दिवसापासून सुरू होईल? चला तर जाणून घेऊयात.
पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2025-2027) 2025 फायनलनंतर सुरू होईल. जो 11 जूनपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाईल. भारताबद्दल बोलायचे झाले तर, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील सायकलमधील पहिली मालिका इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात जून 2025 मध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. याशिवाय जूनमध्येच श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकाही खेळवली जाणार आहे.
Here is the schedule of the Indian team for the World Test Championship Cycle 2025-27 🇮🇳🏏
Can India qualify for the final? 👀#Cricket #India #Test #WTC pic.twitter.com/4L0UcETQaT
— Sportskeeda (@Sportskeeda) January 5, 2025
भारत आपली पहिली मालिका इंग्लंडविरुद्ध खेळणार असून ती जूनमध्ये खेळवली जाणार आहे. उभय संघांमध्ये 5 कसोटी सामने होणार असून ही मालिका जुलैच्या शेवटच्या आठवड्यात संपणार आहे. इंग्लंडचा हा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघाचे यजमानपद भूषवणार आहे. टीम इंडियाला कॅरेबियन संघाविरुद्ध 2 सामन्यांची मायदेशात कसोटी मालिका खेळावी लागणार आहे. भारतीय संघ 2025 च्या हंगामाची सांगता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेने करेल.
यानंतर टीम इंडियाला ऑगस्ट 2026 मध्ये श्रीलंकेचा दौरा करायचा आहे. ज्यात दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जातील आणि त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करेल. त्यानंतर WTC 2025-27 मधील भारताची शेवटची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल जे की भारतीय भुमीवर खेळवली जाईल. ज्यामध्ये पाच कसोटी सामने खेळले जातील.
हेही वाचा-
विराट कोहलीला सहकारी खेळाडूने दिला मोठा सल्ला, म्हणाला मैदानावरील वाद….
टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर, या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा
रणजी ट्राॅफी न खेळण्यासाठी कारणे देवू नयेत, संघातील वरिष्ठ खेळाडूंना गावसकरांनी सुनावले