आयसीसीने महिला वनडे क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत भारताची प्रतिभाशाली फलंदाज स्म्रीती मंधनाने अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.
यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मंधनामध्ये विषेश योगायोग घडून आला आहे.
झाले असे की, मंधाना आयसीसी महिला वनडे क्रमवारी अव्वल स्थानावर आहे तर विराटही पुरूषांच्या आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर दोघांचे जर्सी क्रमांकही सारखेच आहे.
मंधना मागील वर्षापासून चांगली खेळत असून तीने 2018 पासून 15 वनडे सामन्यात खेळताना दोन शतके आणि 8 अर्धशतके केली आहेत.
विंडीज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत विराटने 453 धावा करत 15 गुण कमावले होते. यावेळी त्याने त्याचे पहिले स्थान कायम राखले होते. त्याच्यापेक्षा 28 गुणांनी मागे असलेला रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महिलांमध्येही मंधाना बरोबर भारताची कर्णधार मिताली राज पाचव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–१० वर्षानंतर हार्दिकने केली सचिनच्या त्या विक्रमाची बरोबरी





