जागतिक टी-२० क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या भारतीय संघाने रविवारी (८ जुलै) इंग्लंड विरुद्धची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
या मालिका विजयाबरोबरच सलग सर्वात जास्त टी-२० मालिका जिंकणाऱ्या संघाच्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. तर अव्वल स्थानी पाकिस्तान आहे.
भारतीय संघाचा हा सलग सहावा टी-२० मालिका विजय आहे. भारतीय संघाने १ नोव्हेंबर २०१७ ते ८ जुलै २०१८ या काळात सलग सहा टी-२० मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
भारतीय संघ सलग ६ टी२० मालिका जिंकला आहे. सलग ९ मालिका जिंकत पाकिस्तान या यादीत अव्वल स्थानी #म #मराठी @ranga_ssd @MarathiHashTaG @MarathiRT @BeyondMarathi @kridajagat @MarathiBrain @Mazi_Marathi
— Sharad Bodage (@SharadBodage) July 8, 2018
टी-२० क्रिकेटमध्ये सलग सर्वात जास्त टी-२० मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावे आहे. पाकिस्तानने २०१६ ते २०१८ या काळात सलग ९ टी-२० मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
असे आहेत टीम इंडियाचे सलग सहा टी-२० मालिका विजय-
-नोव्हेंबर २०१७ न्युझीलंड विरुद्ध २-१ ने विजयी
-डिसेंबर २०१७ श्रीलंके विरुद्ध ३-० ने विजयी
-फेब्रुवारी २०१८ दक्षिण अफ्रीके विरुद्ध २-१ ने विजयी
-मार्च २०१८ निदहास ट्रॉफी विजेतेपद
-जून २०१८ आयर्लंड विरुद्ध २-० ने विजयी
-जुलै २०१८ इंग्लंड विरुद्ध २-१ ने विजयी
तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ कधीही तिसरा सामना पराभूत झाला नाही. #म #मराठी @ranga_ssd @MarathiHashTaG @MarathiRT @BeyondMarathi @kridajagat @MarathiBrain @Mazi_Marathi
— Sharad Bodage (@SharadBodage) July 8, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-असा विक्रम करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय!
-भारताने मालिका तर जिंकली पण हे ५ विक्रमही केले