भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरू होत आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा याला संधी देण्यात आली नाहीये. जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुजारा खास कामगिरी करू शकला नव्हता. यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, पुजाराने मैदानावर दमदार पुनरागमन केले आहे. त्याने दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेच्या एका सामन्यात शतक ठोकले आहे. पुजारा या स्पर्धेत वेस्ट झोन संघाकडून खेळत आहे.
दुलीप ट्रॉफी 2023 (Duleep Trophy 2023) स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना वेस्ट झोन विरुद्ध सेंट्रल झोन (West Zone vs Central Zone) संघात खेळला जात आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या स्पर्धेत वेस्ट झोन (West Zone) संघाकडून खेळत आहे. या सामन्यात पुजाराच्या संघाने पहिल्या डावात 220 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता संघ दुसरा डाव खेळत आहे. यामध्ये पुजाराने शानदार शतक झळकावले आहे. संघाच्या 90 षटकांच्या खेळापर्यंत पुजाराने 266 चेंडू खेळत 132 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 1 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर संघाने 90 षटकांच्या खेळापर्यंत 8 बाद 291 धावांपर्यंत मजल मारली.
वेस्ट झोन संघासाठी दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ आणि प्रियांक पांचाळ यांनी डावाची सुरुवात केली. यादरम्यान शॉ फक्त 25 धावांवर बाद झाला. पांचाळने 15 धावा करत तंबूचा रस्ता पकडला. तसेच, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 58 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. याव्यतिरिक्त सरफराज खान 6 धावांवर बाद झाला. हेत पटेल याने 51 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले.
June 23rd – Cheteshwar Pujara dropped from the Indian Test team.
July 7th – Cheteshwar Pujara scored a terrific hundred in the Duleep Trophy Semi.
What a great return for Puj!!! pic.twitter.com/FmWU4ORTev
— Johns. (@CricCrazyJohns) July 7, 2023
पुजाराच्या कामगिरीविषयी थोडक्यात
खरं तर, पुजाराला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघात स्थान मिळाले होते. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यातील पहिल्या डावात फक्त 14 धावा आणि दुसऱ्या डावात 27 धावांचे योगदान दिले. यानंतर भारतीय संघाने त्याला संघाबाहेर केले. पुजाराला वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाहीये. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 12 जुलैपासून पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. तसेच, दुसऱ्या कसोटी सामन्याला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. (indian cricketer cheteshwar pujara hit century west zone vs central zone 1st semi final duleep trophy 2023)
महत्वाच्या बातम्या-
‘आता तू नाहीये म्हणून मीच…’, धोनीच्या वाढदिवशी पंतने उचलले ‘हे’ पाऊल, पाहा कसे केले सेलिब्रेशन
बाप कर्णधार असला तरीही धोनी खेळला आहे ‘या’ ५ सिनीयर-ज्युनियर कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली






