---Advertisement---

भारतीय खेळाडूने ‘केरळ एक्सप्रेस’ श्रीसंतची कपिल देव आणि मोहम्मद शमीशी केली तुलना, पण का?

On: शनिवार, मे 22, 2021 11:47 AM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने काही दिवसांपुर्वीच क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो केरळ संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या ३८ वर्षीय गोलंदाजाने या स्पर्धेत केरळ संघाकडून ५ सामने खेळताना ४ विकेट्स चटकावल्या होत्या. आता त्याचा संघसहकारी आणि भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने त्याच्या प्रदर्शनाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. उथप्पाने प्रशंसा करताना श्रीसंतच्या गोलंदाजीची तुलना कपिल देव आणि मोहम्मद शमी यांच्याशी केली आहे.

‘वेक अप विद सौरभ’ या यूट्यूब शोवर बोलताना उथप्पा म्हणाला की, “श्रीसंत क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर लयीत दिसून आला. त्याची भारताच्या मैदानांवरील चेंडू आउट स्विंग करण्याची शैली अजूनही उत्तम आहे. त्यामुळे माजी भारतीय वेगवान गोलंदाज कपिल देव आणि सध्याचा भारतीय संघाचा अव्वल वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यासोबत श्रीसंतचे नाव घेतले जाऊ शकते.”

गती वाढली तर श्रीसंत बनेल घातक
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत श्रीसंतने १२५ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. याबद्दल बोलताना उथप्पा म्हणाला की, “श्रीसंतने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत चांगल्या गतीने गोलंदाजी केली होती. जर तो अशीच मेहनत घेत राहिला तर त्याच्या गोलंदाजीचा वेग १३० च्याही पुढे जाईल. त्यानंतर तो अधिकच घातलक गोलंदाज बनेल.”

श्रीसंतला धोनी खूप चांगल्याप्रकारे सांभाळून घेत असे
जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत श्रीसंतसारख्या गोलंदाजाला फक्त एमएस धोनीसारखा कर्णधारच सांभाळू शकत असल्याचे उथप्पाने सांगितले आहे.

“श्रीसंतने फलंदाजांविरुद्ध केलेल्या अपीलला थांबवण्यासाठी बऱ्याचदा धोनीला आपली जागा सोडून त्याच्या जवळ जावे लागत असे. विश्वचषक २००७ नंतर आम्ही हैदराबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना खेळत होतो. कदाचित त्यावेळी एंड्र्यू सायमंड्स नॉन स्ट्राईकवर होता. तो श्रीसंतने चेंडू टाकण्यापुर्वीच खेळपट्टीवरील सीमारेषेच्या पुढे गेला होता. त्यामुळे श्रीसंतने चेंडू न टाकता त्याची दांडी उडवली होती. यानंतर श्रीसंतने पंचांकडे जोरदार अपील केली होती. तेव्हा धोनी त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाला होता की, जा तू गोलंदाजी कर,” असे उथप्पाने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा राहुल द्रविडचा टी२०त पाहायला मिळाला होता ‘रुद्रावतार’, मारले होते सलग ३ गगनचुंबी षटकार

द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताचा १-३ने झाला होता दारुण पराभव, श्रीलंका दौऱ्यावर बदलणार नकोसं चित्र?

गुरु हरपला! विराट कोहलीला फलंदाजीचे धडे देणारा प्रशिक्षक काळाच्या पडद्याआड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---