Dinesh Karthik On Mohammed Shami: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे आमने-सामने आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाच्या डावात भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन पाहून भारताचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला मोहम्मद शमी याची आठवण झाली. त्याने म्हटले की, सध्या भारतीय संघाला शमीची उणीव भासत आहे. कार्तिकनुसार, जर शमी असता, तर या खेळपट्टीवर खूप विकेट्स घेऊ शकला असता.
काय म्हणाला कार्तिक?
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या मते, दक्षिण आफ्रिकेत खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळेच मोहम्मद शमी (Mohammed Shami) याचे नसणे संघासाठी मोठे नुकसान आहे. कार्तिक क्रिकबझशी बोलताना म्हणाला की, “एक गोलंदाज म्हणून मोहम्मद शमीची उंची खूपच वाढली आहे. तुम्ही कल्पना करा की, अपराईट सीमसोबत अशाप्रकारच्या खेळपट्टीवर जर शमीने गोलंदाजी केली असती, तर काय घडलं असतं.”
तो पुढे बोलताना म्हणाला की, “मी तुम्हाला वचन देतो की, त्याने इथे नक्कीच विकेट्स घेतल्या असत्या. भारतीय संघाला स्पष्टपणे त्याची उणीव भासत आहे. शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी मिळून 27 षटकात 118 धावा खर्च केल्या आहेत. तसेच, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी मिळून 31 षटकात फक्त 111 धावा खर्च केल्या आहेत. सिराजही त्याच्या स्पेलमध्ये थोडा महागडा ठरला आहे.”
शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बाहेर पडला होता. त्याला दुखापतीमुळे मालिकेचा भाग होता आले नव्हते. शमीला घोट्याची दुखापत झाली होती. जर तो बरा झाला असता, तर तो या मालिकेत खेळताना दिसला असता, मात्र, तो निश्चित वेळेत आपली फिटनेस सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे त्याला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले. विश्वचषक 2023 स्पर्धेत शमी ज्या फॉर्ममध्ये होता, ते पाहता म्हटले जाऊ शकते की, शमीचे संघातून बाहेर असणे भारतासाठी मोठा धक्का आहे. (indian cricketer dinesh karthik reacts on mohammed shami s absence in ind vs sa 1st test)
हेही वाचा-
AUS vs PAK: थेट कपाळावर दिला ॲाटोग्राफ! क्रिकेटर अन् चाहत्याचा भन्नाट फोटो Viral, पाहा कोण आहे तो
Shocking: ‘या’ क्रिकेटपटूला दिल्ली पोलिसांकडून अटक, रिषभ पंतला लावलेला कोट्यवधी रुपयांचा चुना