---Advertisement---

भारतीय दिग्गजाने सांगितली Rinku Singhची ‘अनटोल्ड स्टोरी’, वाचा भारताला कुणामुळे सापडला हा ‘कोहिनूर हिरा’

Rinku-Singh-And-Abhishek-Nayar
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा खेळाडू रिंकू सिंग आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधत आहे. आयपीएलनंतर आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने त्याला फिनिशर का म्हणतात, हे दाखवून दिले आहे. मात्र, रिंकूला इथपर्यंत पोहोचवण्यात कोणाचे सर्वाधिक योगदान राहिले आहे, हे अनेक क्रिकेटप्रेमींना माहिती नाहीये. मात्र, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या टी20 सामन्यानंतर दिनेश कार्तिक याने याबाबत खुलासा केला आहे.

कार्तिकचा खुलासा
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने सांगितले की, अभिषेक नायर (Abhishek Nayar) ही ती व्यक्ती आहे, जी मागील 5-6 वर्षांपासून रिंकूसोबत आहे. तसेच, त्याच्यावर काम करत आहे. खरं तर, नायर कार्तिकचे मित्र असण्यासोबतच त्याचे गुरूही राहिले आहेत. त्यांच्याच प्रशिक्षणाखाली कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात यशस्वी झाला होता.

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये रिंकू सिंग अभिषेक नायर (Rinku Singh Abhishek Nayar) यांची गळाभेट घेताना दिसत आहे. या फोटोमागील भावना कार्तिकने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.

कार्तिकने लिहिले की, “हा सर्वत्र व्हायरल होत असलेला सर्वात समाधानकारक आणि काळजाला भिडणाऱ्या फोटोंपैकी एक आहे. अभिषेक नायर आणि रिंकू सिंग यांच्यातील एक शानदार नाते. ही भागीदारी 2018मध्ये केकेआरमध्ये माझ्या काळादरम्यान सुरू झाली होती. नायरने नेहमीच रिंकूची क्षमता पाहिली. ते मला म्हणत राहिले, तो वास्तवात काही खास करू शकेल, त्यापूर्वीची ही वेळ आहे. अलीगडच्या एका छोट्या शहरातून आल्यामुळे, त्याला फक्त मोठा विचार करण्याची गरज होती आणि मला वाटते की, त्याच्या मानसिकतेत हा बदल नायरसोबतच्या डेथ हिटिंग कौशल्यावर काम केल्यानंतर आला आहे.”

पुढे त्याने लिहिले की, “त्याला जेव्हा दुखापत झाली होती, तेव्हाही नायरने वेंकी म्हैसूर सरांना मनवले, ज्यांनी रिंकूला संघाचा भाग बनवण्यास होकार दिला. तसेच, त्याला केकेआरसोबत प्रवास करण्यास आणि राहण्यासाठी सांगण्यात आले. तो आयपीएलनंतर रिहॅबसाठी अनेक महिने नायरच्या घरी राहिला आणि आपल्या फलंदाजीवर काम करण्यास सुरुवात केली. त्याचे देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम शानदार राहिला आणि त्यानंतर त्याने ते करून दाखवले, जे नायर आणि केकेआरने नेहमीच विचार केला होता की, तो करू शकतो. एक मॅच विनर फिनिशर.”

“आज जेव्हा मी हा फोटो पाहिला, तेव्हा मला असे वाटले की, एक प्रशिक्षकाच्या रूपात नायर यांचा दर्जा आणखी वाढला आहे. तसेच, त्यांना रिंकूसाठी जो आनंद वाटत आहे, तो इतर जगासोबत शेअर करू शकतात. आपल्या कोणत्याही विद्यार्थ्याला जागतिक स्तरावर चांगले प्रदर्शन करताना पाहणे एक अवास्तविक अनुभूती असेल आणि एक प्रसारकाच्या रूपात हे लाईव्ह दाखवणे आणि या क्षणाचा आनंद लुटण्यासाठी पुरेसे भाग्यवानही असले पाहिजे,” असेही शेवटी कार्तिकने लिहिले.

रिंकूचा झंझावात
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 208 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 19.5 षटकात 8 विकेट्स गमावत 209 धावा केल्या. तसेच, सामना 2 विकेट्सने खिशात घातला. यावेळी भारताकडून फलंदाजी करताना रिंकू सिंग याने थोडेच चेंडू खेळले, पण त्याने संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी उचलली. त्याने फक्त 14 चेंडूंचा सामना केला. यावेळी त्याने 157.14च्या स्ट्राईक रेटने नाबाद 22 धावा चोपल्या. त्याने अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारून संघाला विजयी केले. मात्र, हा नो बॉल होता आणि त्या एक धावेनेच भारत विजयी झाला. त्यामुळे रिंकूचा षटकार त्याच्या आणि संघाच्या कामी आला नाही, पण रिंकूने शानदार पद्धतीने सामना संपवला. (indian cricketer dinesh karthik reveals whose hand is behind rinku singh success ind vs aus 1st t20i)

हेही वाचा-
‘तो’ पुन्हा अडचणीत! वर्ल्डकप विजेता भारतीय खेळाडूविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण
सूर्या… इतिहास घडवणारा कॅप्टन! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला आजपर्यंत कुणालाच न जमलेला विक्रम, घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---