आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे कृष्णवर्षीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड यांच्या पोलीस कोठडीतील निधनानंतर वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. क्रीडा जगतदेखील यापासून लांब नाही. अलीकडेच वेस्ट इंडियन दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेलने कबूल केले होते, की तोही संपूर्ण जगभर वर्णभेदाचा बळी ठरला आहे. तसेच आता माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेशनेही याविरोधी आवाज उठविला आहे.
तमिळनाडूचा सलामीवीर फलंदाज अभिनव मुकुंदही याआधी वर्णभेदाचा बळी ठरला होता. गणेशने म्हटलं आहे, की गणेशने (Ganesh Dadda) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 30 वर्षांच्या मुकुंदची जवळपास एक वर्ष जुनी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून गणेशने सांगितले आहे, त्यांनाही आपल्या कारकिर्दीत वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला.
मुकुंदची ही जुनी पोस्ट शेअर करत गणेशने लिहिले, “मुकुंदची ही जुनी कहाणी मला माझ्या काळातील वर्णद्वेषाची आठवण करून देतात. एका अनुभवी भारतीय खेळाडूनेही याची साक्ष दिली. पण याने मला अधिक सामर्थ्यवान केले आणि यामुळे मी भारत आणि कर्नाटककडून 100 सामने खेळू शकलो.”
This story of @mukundabhinav, reminded me of the racial jibes I went through in my playing days. Only an Indian legend was witness to it. It only made me strong & didn’t deter me from playing for Ind & ovr 100 mts for Karnataka @StarSportsKan
ಕಪ್ಪಗಿರೋರು ಮನುಷ್ಯರೇ. ಮೊದಲು ಮಾನವರಾಗಿ. pic.twitter.com/ZV8c8YPmpM— Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ (Modi Ka Parivar) (@doddaganesha) June 3, 2020
गणेशने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 4 कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे.
अभिनव मुकुंद (Abhinav Mukund) यांनी 9 ऑगस्ट 2017 रोजी आपल्या ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भात एक पोस्ट पोस्ट केली होती. ज्यात त्याने लिहिले होते, “मला कित्येक वर्षांपासून माझ्या त्वचेच्या रंगामुळे अपमान सहन करावा लागला आहे. गोरा रंग केवळ मोहक किंवा देखणा नाही. आपला रंग कसाही असो, त्यात खुश रहा. लहानपणापासूनच त्वचेच्या रंगाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन आश्चर्यचकित करणारा असतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर देशाचे पंतप्रधान झालेले ५ खेळाडू
-वनडे सामन्यात ‘या’ ५ भारतीय गोलंदाजांची झाली आहे चांगलीच धुलाई
-रवी शास्त्रींनी शेअर केली अलिबागवरुन निसर्ग वादळाची तुफानी झलक, पहा व्हिडीओ